बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. यामुळे बीडमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, छत्रपती संभाजी महाराज, पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, मराठा आंदोलक मनोज जरांगे आदी उपस्थित होते.
या मोर्चात आलेल्या नेतेमंडळींनी देशमुख हत्या प्रकरणी भाष्य केले आहे.
'धनंजय मुंडे बोगस मतांनी निवडून आले'
मस्साजेग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून आमदार सुरेश धस चर्चेत आहेत. कारण बीड हत्या प्रकरण अगदी सुरूवातीपासून आमदार धस यांनी काही ना काही वक्तव्य केली आहेत. त्यांनी सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. संतोष भाजपचे बुथ प्रमुख होते. संतोष देशमुख यांची अमानवी हत्या करण्यात आली. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत. धनंजय मुंडे बोगस मतांनी निवडून आले असे आमदार धस यांनी म्हटले आहे. चुकीच्या माणसाच्या हातात मंत्रिपद दिल्याचे म्हणत त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
'बीडच्या पालकमंत्र्यामुळे सत्यानाश झालाय'
बीडच्या राजकारणाला कधी जातीचा स्पर्श नव्हता. वाल्मिक कराड हा बीडचे आहेत. बीडमध्ये वंजारी समाजाच्याही अनेकांची हत्या झाल्या आहेत असे पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हटले आहे. जनतेच्या एकीपुढे कोणीही टिकत नाही. मोर्चात माणसांची एकी पाहायला मिळाली. बीडच्या पालकमंत्र्यामुळे सत्यानाश झालाय अशी टीका आव्हाडांनी केली आहे.
हेही वाचा : Beed Murder Case: बीडमधील मोर्चातून जरांगेंचा सरकारवर निशाणा
'बीड हत्याप्रकरणी 19 दिवस झाले तरी आरोपी मोकाट'
बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था राहिली नाही. संतोष देशमुखांच्या आरोपीला फाशी होणारच अशी ठाम भूमिका खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. 19 दिवस झाले तरी आरोपी मोकाट असल्याचे खासदार सोनावणे यांनी म्हटले आहे.
'न्याय मिळाल्याशिवाय मी हटणार नाही'
जातीवर अन्याय करणाऱ्यांना मी सोडत नाही. न्याय मिळाल्याशिवाय मी हटणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. सुरेश धस एकटे सर्वांना काफी आहेत. आम्ही सर्व आमदारांच्या पाठीशी आहे. जनतेला धक्का लागू देणार नसल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
'बीडचा बिहार करायचा आहे का?'
बीड प्रकरणी बोलताना देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका असे छत्रपती संभाजी महाराज यांनी म्हटले आहे. आम्हाला दहशत चालणार नाही. बीडचा बिहार करायचा आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहेत. तसेच आरोपीला अजून अटक का झाली नाही असेही संभाजी महाराज म्हणाले आहेत.
'मुंडेंचे मंत्रिपद वाल्मीक कराडच्या अटकेतील अडथळा'
धनंजय मुंडेंचे मंत्रिपद वाल्मीक कराडच्या अटकेतील अडथळा असल्याचा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. कराडचा सीडीआर तपासण्याचीही आग्रही मागणी त्यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराड यांचे सीडीआर तपासले पाहिजे. धनंजय मुंडे यांच्याकडे मंत्रिपद असल्याने कराडला अटक झाली नाही. आमदार संदीप क्षीरसागर मोर्चात सर्वपक्षीय लोकं सहभागी झाले आहेत. लोकांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा ही भावना आहे. त्या गावातील परिस्थिती मी पाहिली आहे. देशमुखांच्या मृतदेहाचे फोटो पाहून चांगल्या माणसाचेही डोकं सरकेल असे ते फोटो होते असे क्षीरसागर म्हणाले आहेत.