Wednesday, August 20, 2025 09:29:28 AM

मौका देने वाले को धोका और...; परिणय फुकेंची नरेंद्र भोंडेकरंवर खरमरीत टीका

सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात हालचाल सुरू आहे. अशातच, या वादात आता एक नवे वळण आले आहे. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

मौका देने वाले को धोका और परिणय फुकेंची नरेंद्र भोंडेकरंवर खरमरीत टीका

तेजस मोहातुरे. प्रतिनिधी. भंडारा: सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात हालचाल सुरू आहे. अशातच, या वादात आता एक नवे वळण आले आहे. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी वादग्रस्त विधान केल्याने भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भंडाऱ्यातील एका भाजपच्या कार्यक्रमात परिणय फुके यांनी शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, 'मौका देने वाले को धोका और धोका देने वाले को मोका कभी नही देता'. 

हेही वाचा: 'महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा' - मुख्यमंत्री फडणवीस

परिणय फुके काय म्हणाले?

'मौका देने वाले को धोका और धोका देने वाले को मोका कभी नही देता. ज्यांनी पक्षासाठी काम केलं, असा कार्यकर्त्यांसाठी मी अर्ध्या रात्रीसुद्धा उपस्थित आहे. मात्र, ज्यांनी मला धोका दिला, त्यांना मात्र मी सोडत नाही', असे थेट आव्हान भाजपचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिले.

पुढे, परिणय फुके म्हणाले की, 'माझ्यावर अनेकांनी आरोप केले. मात्र, त्या आरोपांना मी कधीही प्रत्युत्तर नाही दिले. कधी चांगलं झालं तर मुलांनी केलं, आईनी केलं, आणि जर वाईट केलं तर बापाने केलं'. या दरम्यान, कार्यकर्त्यांना संबोधत परिणय फुकेंनी वक्तव्य केले की, 'आपण नेहमी सातत्याने पक्ष वाढवला पाहिजे आणि आपल्या कामात लक्ष दिले पाहिजे'. 


सम्बन्धित सामग्री