नागपूर : हिवाळी अधिवेशनात बीड आणि परभणी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केले आहे. परभणीत प्रकरणी घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती त्यांनी दिली. परभणीत संविधानाची प्रतिकात्मक प्रत तोडण्यात आली. त्यामुळे आक्रमक जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या संविधानाची प्रत तोडल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले. त्यांच्या जमावाने काचा फोडल्या, रास्ता रोको केला. शांततेत बंद सुरू असताना जमाव अचानक हिंसक झाला. पोलिसांनी जमावबंदी करत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. काही महिलांनी मोठ्या प्रमाणावर जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. पोलिसांनी वेळीच पावलं उचलल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांकडून आंदोलक महिलांना नोटीस देऊन सोडून देण्यात आलं. हिंसा वाढल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
हेही वाचा : बीड प्रकरणात पोलिस अधिक्षकांची बदली होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 6 वाजेपर्यंत अटकसत्र चालू होते. त्यानंतर कोणालाही अटक केली नाही. आरोपी खरंच माथेफिरु आहे का? याचा डॉक्टरांच्या समितीकडून अहवाल आला आहे. 2012 पासून मनोरुग्ण आरोपीवर उपचार सुरु आहे. संविधानाचा अपमान करणाऱ्यावर जाती-धर्मापलिकडे जाऊन कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बहुतांश आंदोलक शांततेत आंदोलन करत होते. सकल हिंदू समाजाचा मोर्चा केवळ बांगलादेशातील अत्याचाराविरोधात आहे. संविधानाबद्दल मोर्चात एकही शब्द उच्चारला गेला नसल्याचेदेखील फडणवीसांनी सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
कोम्बिंग ऑपरेशनसंदर्भात बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला. कोणत्याही प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेलं नाही. पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड चौकशी होईपर्यंत निलंबित असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. घोरबांड यांनी अतिरिक्त बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना चौकशी होईपर्यंत निलंबित केले आहे. सोमनाथ सूर्यवंशींना पोलिसांकडून कोणतीही मारहाण नाही केली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.