Wednesday, August 20, 2025 09:28:10 AM

पवार कुटुंबात आनंदाची बातमी; युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा

यंदा हा वर्ष पवार कुटुंबीयांसाठी आनंदाचा वर्ष असणार आहे. शरद पवार गटाचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांचा रविवारी साखरपुडा पार पडला.

पवार कुटुंबात आनंदाची बातमी युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा

पुणे: यंदा हा वर्ष पवार कुटुंबीयांसाठी आनंदाचा वर्ष असणार आहे. याचं कारण म्हणजे यावर्षी पवार कुटुंबात एक नसून दोन लग्न होणार आहेत. नुकताच, शरद पवार गटाचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांचा रविवारी साखरपुडा पार पडला. युगेंद्र पवारांचा साखरपुडा तनिष्का नावाच्या तरुणीसोबत झाला असून, याची माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. युगेंद्र आणि तनिष्कासोबतचा फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ही गोड बातमी पोस्ट करताच सुप्रिया सुळेंच्या सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस सुरू झाला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या:

सुप्रिया सुळेंनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये युगेंद्र आणि तनिष्का यांचे फोटो पोस्ट करत कॅप्शन दिलं की, 'आमच्या कुटुंबातील आनंदाची बातमी शेअर करत आहे. माझा पुतण्या युगेंद्र पवार याचा तनिष्कासोबत साखरपुडा पार पडला. त्यांनी आयुष्यभर खुश, आनंदीत आणि एकत्र राहावं हीच इच्छा...तनिष्का तुझं पवार कुटुंबात स्वागत..'

कोण आहे युगेंद्र पवार?

 युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत आणि शरद पवार यांचे नातू आहेत. युगेंद्र यांनी अजित पवारांविरोधात बारामती मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. मात्र, त्यांना अपेक्षित यश प्राप्त नाही मिळालं. सध्या ते विविध पदांवर कार्यरत आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री