वैर माझ्याशी होतं, माझ्या मातीची बदनामी का? असा सवाल धनंजय मुंडेंनी केला आहे. बीडमधील राष्ट्रवादीच्या निर्धार मेळ्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच बाहेरून येऊन बीडची बदनामी केली असेही त्यांनी म्हटले आहे. यावर आम्ही बीडमधील दहशतवादाविरोधात लढलो. धनंजय मुंडे नावाच्या व्यक्तीशी लढलो नाही असा हल्लाबोल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. माझ्याशी वैर होता तर बीडची बदनामी का केली असा डायलॉग धनंजय मुंडे यांनी मारलाय. त्यांना एकच म्हणावसं वाटतं की आम्ही लढलो ते धनंजय मुंडे नावाच्या व्यक्तीशी नाही. बीडशी तर मुळीच नाही असे दमानिया यांनी म्हटले आहे.