Thursday, August 21, 2025 02:29:50 AM

जितेंद्र आव्हाड, रोहित पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी; शरद पवार गटाने घेतले नवे निर्णय

राजकीय वर्तुळात या निर्णयावर चर्चा रंगली असून पवार गटाने नव्या नेतृत्वाला पुढे आणत पक्षाच्या भविष्यासाठी मजबूत तयारी सुरू केली आहे

जितेंद्र आव्हाड रोहित पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी शरद पवार गटाने घेतले नवे निर्णय

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यानंतर शरद पवार गट नव्याने पुढील लढ्यासाठी तत्पर झाला आहे. नुकत्याच झालेल्या आमदारांच्या बैठकीत पक्षासाठीचे महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली दरम्यान, पक्षाच्या रणनीतीसाठी नवी जबाबदारी वाटप करण्यात आली. पक्षाचे विधीमंडळ गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड, मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर. आर. पाटील, आणि प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तिन्ही नेत्यांच्या मोठ्या जबाबदारीची अर्थात या निर्णयाची घोषणा जयंत पाटील यांनी केली.या बैठकीत जिंतेद्र आव्हाड, रोहित आर आर पाटील आणि उत्तम जानकर यांच्यावर मोठी जबादारी सोपवण्यात आली आहे.तिन्ही नेत्यांकडे महत्वाकांक्षी जबाबदारी सोपवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय समीकरणांना नवी कलाटणी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात या निर्णयावर चर्चा रंगली असून पवार गटाने नव्या नेतृत्वाला पुढे आणत पक्षाच्या भविष्यासाठी मजबूत तयारी सुरू केली आहे. जयंत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदे घेतली तेव्हा ते म्हणाले,' ‘विधिमंडळ नेता आज निवडण्यात आलेला नाही. संदीप क्षीरसागर आज उपस्थित‌ नव्हते. आमची संख्या जरी कमी असली तरी आम्ही लोकांचे प्रश्न मांडू.' त्याचबरोबर जयंत पाटील यांनी  निवडणुकीतील अनियमितता आणि मतांच्या आकडेवारीतील विसंगतीबाबत चिंता व्यक्त केली.  माहिती दडपण्याचा हा प्रकार असल्याचा संशय यतोय. मतदारसंघांतील गोंधळ, बॅलेट पेपर वापराचा प्रस्ताव,आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणीही त्यांनी केली.

त्याचबरोबर,  लाडक्या बहीणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांनासुद्धा योजनेची संधी द्यावी आणि लवकरात  लवकर २१०० रुपये सुरु करावे,सोयाबीनला ६००० रुपये भाव द्या. शपथ घेऊन लोकांना लवकर दिलासा द्यावा अशी अपेक्षा आहे,अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.
  

 


सम्बन्धित सामग्री