महाराष्ट्र : सर्वच लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याची. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरु झाली तेव्हा पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येताय. त्यानंतर या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांहून 2100 रुपये करण्यात येणार असल्याचं महायुती सरकारकडून सांगण्यात आलं होत. परंतु आजही या लाडक्या बहिणी वाढीव हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलीय.
हेही वाचा: india's Pollution: भारतातील शहरे गुदमरली! जगातील 20 प्रदूषित शहरांपैकी 13 भारतातच
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे. आवश्यक वाटल्यास पुढे आणखी तरतूद करण्यात येईल. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत. आर्थिक ताळमेळ साधून 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
दरम्यान अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांबाबत कोणतीही घोषणा केली गेली नाही. त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभेत आदिती तटकरेंनी यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. आम्ही लाडकी बहीण योजनेत या अर्थसंकल्पात 2100 रुपये देऊ, अशी घोषणा केली नव्हती. जाहिरनामा हा 5 वर्षांसाठी आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षात कधीही 2100 रुपयांबाबत घोषणा केली जाऊ शकते. असे समोर आलंय.
दरम्यान सर्वच लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याची. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरु झाली तेव्हा पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येताय. त्यानंतर या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांहून 2100 रुपये करण्यात येणार असल्याचं महायुती सरकारकडून सांगण्यात आलं होत. परंतु आजही या लाडक्या बहिणी वाढीव हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलीय.