मुंबई: मागील काही दिवसांपसून राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्याकडून उमेदवारांची नावे समोर आली आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी, एनडीएतर्फे सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडी यांच्याकडून उपराष्ट्रपतीपदासाठी बी. सुदर्शन रेड्डी हे यांची नावे देण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी, विरोधकांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, यासाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. 'उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काल फडणवीसांनी मला फोन केला होता', अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवारांनी दिली आहे. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: Anjali Tendulkar यांनी मुंबईत खरेदी केलं अपार्टमेंट; जाणून घ्या, किती आहे किंमत?
शरद पवार काय म्हणाले?
'काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला कॉल केला होता. त्यांनी मला विनंती केली की, तुम्ही उपराष्ट्रपतीपदासाठी सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा. यावर, मी त्यांना सांगितलं की, सी.पी. राधाकृष्णन आमच्या विचारांचे नाहीत आणि आम्ही त्यांना पाठिंबा नाही देऊ शकत. आम्ही उपराष्ट्रपतीपदासाठी, बी. सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल केला आहे. जेव्हा सी.पी. राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल होेते, तेव्हा झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आले होते', अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवारांनी दिली.
राहुल गांधींच्या वोटर अधिकार यात्रेबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, 'राहुल गांधींच्या राहुल गांधींच्या बिहार दौऱ्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच, निवडणूक आयोग त्यांचे काम योग्य प्रकारे करत नाही, त्यामुळे मतदार यादीबद्दल आमचा अभ्यास सुरू आहे'.