Monday, September 01, 2025 02:33:44 PM

Ganesh Chaturthi 2025 : ढोल ताशांच्या गजरात 'या' राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन; जाणून घ्या

गणपती बाप्पा मोरया! ढोल ताशांच्या गजरात अनेकांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले. यानिमित्ताने आज अनेक राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले.

ganesh chaturthi 2025  ढोल ताशांच्या गजरात या राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन जाणून घ्या

मुंबई: गणपती बाप्पा मोरया! ढोल ताशांच्या गजरात अनेकांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले. यानिमित्ताने आज अनेक राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. चला तर जाणून घेऊया आज कोणकोणत्या राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. 

वर्षा बंगल्यावर गणरायाचं आगमन, फडणवीसांच्या हस्ते महाआरती

वर्षा बंगल्यावर आज गणरायाचे आगमन झाले. यानिमित्ताने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. बुधवारी दुपारी 12: 50 वाजता गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 

उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची भेट

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राजसाहेब ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. 

शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान

बुधवारी, शिवसेना शिंदे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले असून, त्यांनी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली.

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या घरी गणपती बाप्पाचं उत्साही वातावरणात आगमन

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या कसबा बावडा, कोल्हापूर येथील निवासस्थानी गणपती बाप्पाचं उत्साही वातावरणात आगमन झाले. यादरम्यान, सतेज पाटील यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ वाय पाटील समूहाचे अध्यक्ष डॉ संजय पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.


सम्बन्धित सामग्री