Wednesday, September 03, 2025 09:03:55 PM

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची हत्या

होळीच्या दिवशी पंजाबमधून एक धक्कादायक माहिती समोर आलीय. पंजाबच्या मोगामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची हत्या

होळीच्या दिवशी पंजाबमधून एक धक्कादायक माहिती समोर आलीय. पंजाबच्या मोगामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंगत राय मंगा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसाठी काम करत होते. परंतु आता यांची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडालीय .  मंगत हे गुरुवारी रात्री 10 वाजता दूध आणायला गेले. त्याचवेळी तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. आणि परिसरात एकाच खळबळ उडाली. 

हेही वाचा : दैनंदिन जीवनात उसाचा रस पिण्याचे फायदे

याबाबत अधिक माहिती अशी की ,  मंगत राय मंगा यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. त्यावेळी एका 11 वर्षीय मुलाला गोळी लागली. त्यानंतर दुचाकी सोडून मंगत राय मंगा यांनी गोळीबार करणाऱ्यांचा पाठलाग केला. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर गोळीबार करणारे घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकारांची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी मंगत यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मंगत यांना मृत घोषित केले. दरम्यान या सर्व प्रकारामध्ये 11 वर्षीय जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी मुलाला सुरुवातीला मोगा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवण्यात आलं.

या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस संदर्भाचा पुढील तपास करीत आहे. पंजाबच्या मोगामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंगत राय मंगा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसाठी काम करत होते. परंतु आता यांची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडालीय .  मंगत हे गुरुवारी रात्री 10 वाजता दूध आणायला गेले. त्याचवेळी तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. आणि परिसरात एकाच खळबळ उडाली. 
 


सम्बन्धित सामग्री