Thursday, August 21, 2025 12:35:05 AM

राहुल गांधीं व राज्याचे ३ मोठे नेते  परभणी दौऱ्यावर

राहुल गांधी, उदय सामंत, संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकर आज परभणी दौऱ्यावर.

राहुल गांधीं व राज्याचे ३ मोठे नेते  परभणी दौऱ्यावर

परभणी: लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर सोमवारी परभणी दौऱ्यावर जाणार आहेत. परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी परभणी येऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

राहुल गांधी दुपारी 2:15 वाजता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सांत्वन देतील. त्यानंतर ते आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा करणार आहेत. विजय वाकोडे हे आंबेडकरी चळवळीचे प्रसिद्ध कार्यकर्ते होते. सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्ययात्रेत सहभाग नोंदवून ते घरी परतत असतांना त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 

उद्योग मंत्री उदय सामंत दुपारी 12 वाजता परभणी येथे परभणीमध्ये येणार असून ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधणार आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ दुपारी 1:30 वाजता परभणीतील सूर्यवंशी कुटुंबीयांना भेट देऊन त्यांना सांत्वन करतील. 

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर सायंकाळी 6 वाजता विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील, नंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना सांत्वन देतील.


सम्बन्धित सामग्री