Rajan Vichare Controversial Statement: काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवाद विरोधी कारवाईत मास्टरमाइंड हाशिम मुसा ठार करण्यात आला. या कारवाईनंतर राजन विचारे यांनी माध्यमांसमोर केलेल्या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विचारेंच्या या विधानामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे. केंद्र सरकारच्या दहशतवाद विरोधी भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी देशातील सुरक्षेच्या बाबतीत असंतोष व्यक्त केला.
काय म्हणाले राजन विचारे?
राजन विचारे म्हणाले, 'अतिरेकी मारले म्हणजे मेहेरबानी केली का? पहलगाम आपल्या देशात आहे, पाकिस्तानमध्ये नाही; आज या घटनेला 100 दिवस झाले, 27 कुटुंब उध्वस्त झाली आहेत आणि एवढ्या दिवसांनी जर दहशतवादी पकडले जात असतील तर मोठा डंका वाजवण्याची काय गरज?' त्यांनी पुढे म्हटले, 'आज संपूर्ण देश याबाबतीत खवळलेला आहे'