मुंबई: मनोज जरांग पाटलांचे आज आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे. मराठा आंदोलकांनी सरपंच मंगेश सांबळे आझाद मैदानावर आंदोलनावेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. मंगेश सांबळे यांनी मागच्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. यावेळी सदावर्तेंचा वेल्डिंगचा चष्मा फोडणार असल्याचे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठ्यांविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे मराठा आंदोलक मंगेश साबळेंनी काही तरुणांसह सदावर्तेंच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. सदावर्ते हे मराठा समाजाला माजुरडे म्हणतात. मराठ्यांना आरक्षण मिळूच देणार नाही. तसेच मराठ्यांच्या सभांना ते जत्रा म्हणतात यामुळे त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या असल्याचे मंगेश साबळे यांनी सांगितले होते. यावेळीही त्यांनी काही अनुचित प्रकार घडल्यास जरांगे जबाबदार असे म्हटले आहे. मागे सदावर्तेंच्या गाडीच्या काचा फोडल्या आता त्यांचा वेल्डिंगचा चष्मा फोडू असे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.
Mumbai Trafic Update: मुंबईत मराठ्यांच्या आंदोलनादरम्यान वाहतुकीत बदल
मराठा आंदोलक म्हणाले, सदावर्ते आणि फडणवीसांना मा* आलाय.. मंगेश साबळे हेच सदावर्तेंची जिरवू शकतात. सरकारने 5 हजार आंदोलकांना आंदोलनाची परवानगी दिली आहे. आम्ही पाच पाच हजारांच्या असे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.