बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. संतोष देशमुख यांच कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. कुटुंबाकडून सीआयडी चौकशीची मागणी केली जात आहे. सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी प्रकरण दाबण्याच्या भानगडीत पडू नका. या प्रकरणात जातीचे लोक पाठीशी घालू नका. हा रास्ता रोको नाही तर न्यायाची प्रक्रिया आहे. महाराष्ट्रातील जनतेने संयम दाखवा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी हा विषय तातडीने हाताळावा. तुम्ही संवेदनशील असाल तर हे शांततेत हाताळा. 24 तास उलटून देखील अद्याप मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेले नाही. त्यामुळे हे प्रकरण गंभीर घेणे गरजेचे असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.