Sunday, August 31, 2025 02:57:49 PM

बीड प्रकरणात पोलिस अधिक्षकांची बदली होणार

बीडमधील संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे.

बीड प्रकरणात पोलिस अधिक्षकांची बदली होणार

नागपूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात चर्चा होत आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिले आहे. बीडमधील संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे.  पोलिसांनी कुचराई केल्याने बीडच्या पोलिस अधीक्षकांची बदली करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोळेमुळे खणून काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. गुन्ह्याचा मास्टरमाईंड कोणीही असला तरीही कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. वाल्मिक कराडचा गुन्हा सिद्ध झाला तर कारवाई होणारच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. एका गुन्ह्यात वाल्मिक कराडचा हात असल्याचं सिद्ध झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीड आणि परभणी प्रकरणी अधिवेसनात निवेदन सादर केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गंभीर आहे. बीड प्रकरणी हत्येपुरतं नाही. याची पाळेमुळे खणावी लागतील. एव्हाडा एनर्जी यांनी बीडमध्ये पवनचक्कीत गुंतवणूक केली आहे. यातून काही लोकांना रोजगार मिळत आहे. आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या असा प्रकार सुरू आहे.

बीड प्रकरणात कुणीही मास्टरमाइंड असला तरी त्याच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस महानिरीक्षक पातळीवरील एसआयटी स्थापन केली जाणार आहे. न्यायालयीन चौकशीची ही घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

 

बीड प्रकरणात काय झालं होतं?

एव्हाडा एनर्जी यांनी बीडमधील पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली. या मधून काही लोकांना रोजगार मिळत आहे. आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या असा प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे. यात अशोक घुले, नारायण घुले. प्रतिक घुले असे आरोपी दुपारी तिकडे गेले. तेथील वॉचमनला मारहाण केली. पीडितांनी सरपंचांना फोन केला.आरोपी बाजूच्या गावचे होते. देशमुख आणि अन्य काहीजण तिथे पोहचले. त्यांना चोप दिला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 9 डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले. त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले आणि स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली. काही दिवसांनी त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली.


सम्बन्धित सामग्री