सद्या सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे भाजपाचा नवा अध्यक्ष कोण? त्यातच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येतेय. भाजपाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष याच आठवड्यात ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पक्षाच्या स्थापन दिनाच्या आधी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव पक्ष जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली असल्याने भाजपाचा नवा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
हेही वाचा: Raj Thackeray: राज ठाकरेंचा परप्रांतीयांना इशारा
त्याचबरोबर भाजपाच्या अध्यक्ष पदासाठी धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, डी पुरंदरेश्वरी त्याचबरोबर विनोद तावडे यांचं नाव समोर आलंय. म्हणजेच या सर्वांच्या नावाची भाजपाचा नवा अध्यक्ष म्हणून चर्चा होतेय. परंतु या चर्चेनंतर आता नक्की कोण भाजपाचा नवा अध्यक्ष ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे.
दरम्यान अवघ्या काही दिवसांवर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, तामिळनाडू, बिहार या राज्यांच्या निवडणूक येऊन ठेपल्या आहेत. याच पार्शवभूमीवर पक्षाच्या स्थापन दिनाच्या आधी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव पक्ष जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली असल्याने भाजपाचा नवा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.