नागपूर : नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. 33 वर्षानंतर नागपूरात हा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. महायुतीकडून 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सर्वप्रथम भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथ घेतली. त्यानंतर भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तिसऱ्यांदा राष्ट्रवादी पक्षाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर एक एक करत 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
फडणवीस सरकारमधील 'या' आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- चंद्रशेखर बावनकुळे
- राधाकृष्ण विखे पाटील
- हसन मुश्रीफ
- चंद्रकांत पाटील
- गिरीश महाजन
- गुलाबराव पाटील
- गणेश नाईक
- दादा भुसे
- संजय राठोड
- धनंजय मुंडे
- मंगलप्रभात लोढा
- उदय सामंत
- जयकुमार रावल
- पंकजा मुंडे
- अतुल सावे
- अशोक उईके
- शंभूराज देसाई
- आशिष शेलार
- दत्तात्रय भरणे
- अदिती तटकरे
- शिवेंद्रराजे भोसले
- माणिकराव कोकाटे
- जयकुमार गोरे
- नरहरी झिरवाळ
- संजय सावकारे
- संजय शिरसाट
- प्रताप सरनाईक
- भरत गोगावले
- मकरंद जाधव
- नितेश राणे
- आकाश फुंडकर
- बाबासाहेब पाटील
- प्रकाश आबिटकर
- माधुरी मिसाळ
- आशिष जयस्वाल
- पंकज भोयर
- मेघना बोर्डीकर
- इंद्रनील नाईक
- योगेश कदम
राज्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नेते
१ माधुरी मिसाळ
२ आशिष जयस्वाल
३ पंकज भोयर
४ मेघना बोर्डीकर
५ इंद्रनील नाईक
६ योगेश कदम