Sunday, August 31, 2025 11:13:48 AM

राज ठाकरेंच्या भेटीला उदय सामंत; ठाकरेंच्या घरी खलबतं, नेमकी काय झाली चर्चा?

उद्योगमंत्री उदय सामंतही राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थावर गेल्याने चर्चांणा उधाण आले आहे.

राज ठाकरेंच्या भेटीला उदय सामंत ठाकरेंच्या घरी खलबतं नेमकी काय झाली चर्चा

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असतानाच पुन्हा महायुतीचे नेते राज ठाकरेंशी जवळीक करताना पाहायला मिळत आहेत. नुकतच महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीत सव्वातास चर्चा झाली. यानंतर राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंतही राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थावर गेल्याने चर्चांणा उधाण आले आहे. अशातच या भेटीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

मराठी भाषा आणि साहित्य संमेलनासंदर्भात राज ठाकरेंसोबत चर्चा झाल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी राज ठाकरेंना भेटले असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच  राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा :  रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? व्हॉट्सअप स्टेटसवरून चर्चांना उधाण

राज ठाकरेंना भेटल्यावर ज्ञानात भर पडते. या भेटीत राजकारणापलीडकडे जाऊन चर्चा झाली. त्यामुळे वैयक्तिक बैठकीत काय चर्चा होईल याचा अंदाज लावणे योग्य नसल्याचेही सामंतांनी म्हटले. पालकमंत्रिपदाचा तिढा 2, 3 दिवसांत सुटेल. तसेच राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार असतील तर दोघं चर्चा करतील असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. सामंतांच्या वक्तव्याने राजकीय संकेत निर्माण झाले आहेत. आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील अशा चर्चांणा उधाण आले आहे.


सम्बन्धित सामग्री