Thursday, September 18, 2025 08:15:10 AM

Uddhav Thackeray: 'समाज कंटकांना अशी कृती करून महाराष्ट्र पेटवायचा...', मीनाताईंच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक

शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. पण आम्ही त्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. आरोपीला त्वरित पकडू, असे पोलिसांनी सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हटले आहे.

uddhav thackeray समाज कंटकांना अशी कृती करून महाराष्ट्र पेटवायचा मीनाताईंच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई: दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा धक्कादायक प्रकार काही समाज कंटकांनी केला आहे. हा प्रकार आज सकाळी उघड झाला. यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. त्यामुळे शिवसैनिकांच्या तीव्र भावना पाहता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याची पाहणी केली. शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. पण आम्ही त्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. आरोपीला त्वरित पकडू, असे पोलिसांनी सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हटले आहे.  समाज कंटकांना अशी कृती करून महाराष्ट्र पेटवायचा असेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काही समाज कंटकांनी लाल रंग फेकल्याचा प्रकार आज सकाळी समोर आला. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. त्यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही पुतळ्याची पाहणी करुन माहिती घेतली. 

हेही वाचा: Raj Thackeray: : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याप्रकरणी राज ठाकरेंकडून घटनास्थळाची पाहणी, उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडला, हे करणाऱ्या दोन प्रवृत्ती असू शकतात. एक तर ज्याला स्वत:च्या आई वडिलांचे नाव घ्यायला लाज शरम वाटते अशाच बेवारस लाव्हारीस माणसाने केले असेल आणि दुसरे बिहारमध्ये ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा अवमान झाला म्हणत काही जणांनी बिहारमध्ये बंद करण्याचा असफल प्रयत्न केला. असाच कुणाचा तरी महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न असेल".

पोलिसांशी आम्ही चर्चा केली, सीसीटीव्ही फुटेज तपासून आम्ही आरोपीला तत्काळ पकडू असे पोलिसांनी म्हटल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. समाज कंटकांना अशी कृती करून महाराष्ट्र पेटवायचा असेल, अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आम्ही सगळ्यांना शांत राहायला सांगितले आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ते लवकरात लवकर आरोपीला शोधतील, अशी आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. 

 

 


सम्बन्धित सामग्री