लातूरमध्ये तटकरेंच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषीमंत्र्यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओचा निषेध केला. यावेळी त्यांनी पत्ते फेकेले आणि पत्रकार परिषदेत तुफान राडा झाला. सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर विजय घाडगे जखमी झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र दुसरीकडे सूरज चव्हाण फरार आहेत. सूरज चव्हाण तटकरेंच्या बंगल्यावर लपलाय असा गंभीर आरोप पीडित विजय घाडगे यांनी केला आहे. तसेच जर चव्हाण तटकरेंच्या बंगल्यावर नसतील तर कुठल्यातरी मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर असतील असेही त्यांनी म्हटले आहे.
लातूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले. छावा संघटनेचे कार्यकर्ते सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी विजय घाडगे आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत राडा झाला आणि राष्ट्रवादीचे माजी प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत घाडगे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीनंतर राष्ट्रवादी पक्षाकडून चव्हाणांचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सुरज चव्हाण फरार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. सूरज चव्हाण तटकरेंच्या बंगल्यावर असल्याचा आरोप पीडित विजय घाडगे यांनी केला आहे.