Sunday, August 31, 2025 05:36:02 PM

कोण एकनाथ खडसे? मंत्री गिरीश महाजनांचा सवाल

मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये जुंपली आहे. कोण एकनाथ खडसे? असा सवाल महाजनांनी केला आहे. महाजन एक सुसंस्कृत, जगविख्यात माणूस असल्याचा टोमणा एकनाथ खडसे यांनी मारला आहे.

कोण एकनाथ खडसे मंत्री गिरीश महाजनांचा सवाल

जळगाव: मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये जुंपली आहे. कोण एकनाथ खडसे? असा सवाल महाजनांनी केला आहे. महाजन एक सुसंस्कृत, जगविख्यात माणूस असल्याचा टोमणा एकनाथ खडसे यांनी मारला आहे. जळगावचे दोन नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात नेहमीच वादविवाद पाहायला मिळतात. 

कोण एकनाथ खडसे?
जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा जुंपल्याचे चित्र बघायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांच्यावर प्रश्न विचारल्यावर कोण एकनाथ खडसे असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. कोण एकनाथ खडसे असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकनाथ खडसे यांना डिवचले आहे. एकनाथ खडसे विधान परिषदेत काही बोलत असतील तर त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. एकनाथ खडसे यांनी नार पार प्रकल्प खोऱ्याबाबत प्रश्नच चुकीचा विचारला. म्हातारपणामुळे माझी बुद्धी कमजोर झाली आहे असं स्वतःच एकनाथ खडसे यावेळी म्हटल्याचे महाजनांनी सांगितले. 

हेही वाचा: महाराष्ट्रात सर्व संजय नावाच्या व्यक्ती चर्चेत; मंत्री गिरीश महाजनांचा टोला

'गिरीश महाजन जग विख्यात माणूस'
मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना डिवचले आहे. गिरीश महाजन एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. गिरीश महाजन जग विख्यात माणूस आहे. मी एक लहान माणूस आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मला कुणी ओळखत नाही. गिरीश महाजन यांनी खडसे कोण खडसे असं विधान एकनाथ खडसे संदर्भात केले होते. त्यामुळे एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यासंदर्भात खोचक वक्तव्य केलं. 


सम्बन्धित सामग्री