मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस एक एक धागेदोरे समोर येत आहेत. अंजली दमानिया यांचं ट्विट सध्या समोर येत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना पवनचक्की प्रकरणातून अपहरण करून मारहाण करण्यात आली. त्यातूनच शेवटी त्यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विट पोस्टची चर्चा आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
अंजली दमानिया यांनी केलेली पोस्ट
सीआयडीला स्कॉर्पियो गाडीमध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिकवर करण्यात येत आहे, त्यामध्ये संतोष देशमुख ना मारहाण करतानाचे व्हिडीओ आहेत. पण एका बड्या नेत्याचा फ़ोन गेला हे देखील आहे.
कोण आहे हा बडा नेता ? तत्काळ नाव जाहीर करा असे दमानिया यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.
सरपंच देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्येला 19 दिवस उलटून गेले तरी मुख्य आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणातील काही आरोपींना पकडण्यात आले आहे. मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे. अशातच बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले. जोपर्यंत वाल्मिक कराड यांना अटक करावी, देशमुख यांना न्याया मिळावा, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मोर्चातील नेत्यांकडून करण्यात आली.
हेही वाचा : रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल; कारण काय?