भंडारा: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावला आहे. 'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही', 'राजाचा मुलगा राज्य करणार नाही तर, काम करेल तोच राज्य करेल', 'काम करत राहा. चिंता करू नका, अपना भी टाईम आयेगा', अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंवर 'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही', 'राजाचा मुलगा राज्य करणार नाही तर, काम करेल तोच राज्य करेल', 'काम करत राहा. चिंता करू नका, अपना भी टाईम आयेगा', अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंवर टीका केली आहे.
हेही वाचा: रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्र वाघ यांचा हल्लाबोल
नेमकं प्रकरण काय?
शनिवारी, आभार यात्रेच्या निमित्ताने भंडारा येथे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळावा स्थानिक रेल्वे मैदानावर झाला. यादरम्यान, शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंना टोला लगावला. 'वाघाचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही' असं वक्तव्य शिंदेंनी केले.
हेही वाचा: मोहल्ला कमिटी बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक
एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया:
'कार्यकर्ते हीच पक्षाची आणि नेत्यांची खरी ताकद आहे. जे कार्यकर्त्यांना विसरतात, त्यांची गत आपण पाहिली आहेच. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे राजाचा मुलगा राज्य करणार नाही तर, काम करेल तोच राज्य करेल. त्यामुळे काम करत राहा. चिंता करू नका, अपना भी टाईम आयेगा', नाव न घेता एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला.
पुढे शिंदे म्हणाले की, 'आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मात्र या महाराष्ट्राला सोन्याचे दिवस आणण्यासाठी काम करतोय. सीएम असताना कॉमन मॅन म्हणून वावरलो. आज डीसीएम आहे. लोक प्रेमाने ‘डेडिकेटेड टू कॉम मॅन’ म्हणतात. पदे येतात आणि जातात. मात्र लाकडा भाऊ ही राज्यातील बहिणींनी दिलेली पदवी आपल्यासाठी सर्वात मोठी आहे. कितीही अफवा पसरवू द्या, मात्र ही योजना बंद होणार नाही. त्यासाठी पूर्ण तरतुद करून ठेवली आहे, प्रिंट मिस्टेक म्हणणारे आमचे सरकार नाही'.
यावेळी राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आमदार मनिषा कायंदे, पक्षाचे पूर्व विदर्भ समन्वयक उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी आमदार सहसराम कोरटे, मनोहर चंद्रीकापुरे, डॉ. अश्वीनी भोंडेकर यांच्यासह विदर्भातील जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.