Monday, September 01, 2025 10:42:47 AM

या दिशेला तोंड करून जेवल्यास होऊ शकतो वास्तुदोष, जाणून घ्या योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला तोंड करून जेवणे महत्त्वाचे असून चुकीची दिशा नकारात्मक ऊर्जा वाढवते.

या दिशेला तोंड करून जेवल्यास होऊ शकतो वास्तुदोष जाणून घ्या योग्य दिशा

वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीची योग्य दिशा सांगितलेली असते, मग ते घराचे बांधकाम असो किंवा घरातील प्रत्येक खोलीची व्यवस्था. त्याचप्रमाणे, भोजनगृहाची आणि भोजन करताना घेतली जाणारी दिशा देखील महत्त्वाची आहे. जर आपण चुकीच्या दिशेला तोंड करून भोजन केले, तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो.

योग्य दिशा कोणती?
    •    वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा भोजनगृहासाठी सर्वोत्तम मानली जाते.
    •    जर भोजनगृह पश्चिम दिशेस नसेल, तर जेवताना पश्चिम दिशेला तोंड करावे.
    •    स्वयंपाकघरात जेवायचे असल्यास, पश्चिम दिशेत बैठक व्यवस्था असावी.
    •    वॉशबेसिन पूर्व दिशेला, तर फ्रीज आणि अन्नसाठवण पश्चिम दिशेला ठेवावे.

हेही वाचा : Mahakumbh 2025: Last Shahi Snan : महाकुंभाचे शेवटचे शाही स्नान कधी? काय आहे महत्व

भोजनगृहासाठी शुभ रंग कोणते?

वास्तुशास्त्रानुसार नारंगी रंग भोजनगृहासाठी सर्वात शुभ मानला जातो. तसेच हिरवा, क्रीम आणि हलका गुलाबी रंग देखील सुख-समृद्धी आणि आर्थिक वृद्धीला चालना देतात.

योग्य दिशेचा अवलंब करून आरोग्य, सुख-शांती आणि समृद्धी प्राप्त करा!

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.

 


सम्बन्धित सामग्री