Friday, September 05, 2025 08:14:53 AM

Famous Places In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील 'हे' ठिकाण तुम्ही पहिला का? जाणून घ्या

कोल्हापूर शहर खव्यांसाठी आवडीचे ठिकाण आहे. नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी कोल्हापूर या शहराला भेट देण्यासाठी योग्य मानला जातो. जाणून घेऊया कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

famous places in kolhapur कोल्हापूर जिल्ह्यातील हे ठिकाण तुम्ही पहिला का जाणून घ्या

कोल्हापूर शहर म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते महालक्ष्मी देवी, कुस्तीचा आखाडा, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरची झणझणीत मिसळ आणि तांबडा पांढरा रस्सा, रंकाळा तलाव, राजश्री शाहू महाराज आणि बरेच काही. या शहराला लाभलेल्या ऐतिहासिक वारसामुळेदेखील कोल्हापूर शहर प्रसिद्ध आहे. इतकेच नाही तर याच कोल्हापूर शहरात, भारतातील पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' चित्रित करण्यात आले होते. खव्यांसाठी सुद्धा कोल्हापूर शहर आवडीचे ठिकाण आहे. 
         आर. माधवन, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, यासारखे अनेक कलावंत कोल्हापूर शहराचे कौतुक करतात. हिवाळ्यात नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी कोल्हापूर या शहराला भेट देण्यासाठी योग्य मानला जातो. चला तर जाणून घेऊया कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. 

हेही वाचा: गुरु आणि शुक्राची महायुती! 1 एप्रिलपासून मिळणार 'या' तीन राशींना भाग्याची साथ



1 - कणेरी मठ:

कणेरी मठ हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये असून हे सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन ठिकाणांपैकी एक आहे. कणेरी मठ या ठिकाणाला सिद्धगिरी ग्राम जीवन संग्रहालय या नावानेदेखील ओळखले जाते. 7 एकरमध्ये विस्तारलेल्या या ठिकाणी आपल्याला पूर्वीच्या काळातील ग्रामीण संस्कृती पाहायला मिळते. त्यासोबतच कणेरी मठ हे ठिकाण महादेवांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. अनेक भाविक या मंदिरात महादेवांच्या दर्शनासाठी येतात. कणेरी मठ कोल्हापूर बस स्थानकापासून 13 किलोमीटर अंतरावर आहे.


2 - कोपेश्वर महादेव मंदिर:

कोपेश्वर महादेव मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूरमध्ये असून हे मंदिर त्याच्या अप्रतिम वास्तुशैलीचा नमुना आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व आहे. कोपेश्वर महादेव मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेले पवित्र ठिकाण आहे. इथे महादेव आणि श्रीविष्णू यांची पूजा केली जाते. या ठिकाणी तुम्हाला नंदीची मूर्ती सापडणार नाही. त्यामागे ऐतिहासिक कारण आहे. 

हेही वाचा: Holi 2025: होळी पौर्णिमेची पूजा कशी करावी? पवित्र विधी, होलिका दहन जाणून घ्या सविस्तर
 

3 - नरसिंहवाडी:

नरसिंहवाडी हे ठिकाण नरसोबाची वाडी या नावानेही प्रसिद्ध आहे. नरसिंहवाडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असून हे ठिकाण नृसिंहसरस्वती स्वामींसाठी विशेष ओळखले जाते. असे म्हणतात, की  आदिलशहा आपल्या मुलीच्या दृष्टीसाठी या ठिकाणी आला होता. तेव्हा आदिलशहाने दत्त महाराजांकडे त्यांच्या मुलीची दृष्टी परत मागितली होती. मान्यतेनुसार, त्या नदीकाठी असलेल्या वनात पूर्वी केवळ श्रींच्या पादुका होत्या. जेव्हा त्या पादुकांवर आदीलशहाच्या मुलीने मस्तक ठेवले होते, त्याचक्षणी तिची दृष्टी परत मिळाली.

4 - गगनगिरी आश्रम मठ:

गगनगिरी आश्रम मठ हे ठिकाण गगनबावडामध्ये असून हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण कोल्हापूर शहापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे. गगनगिरी आश्रम मठातून दऱ्या-डोंगराचे सौंदर्य तुम्हाला आकर्षित करेल. पावसाळ्यात हे ठिकाण डोळ्यांना सुखद अनुभव देतो. 

(Disclaimer:  येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री