भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत ज्या तिथल्या चमत्कारिक, रहस्यांनी भरलेले आहेत. भारतातील मंदिरे गेल्या अनेक वर्षांत आपल्या भारतीय संस्कृती आणि प्राचीन परंपरा यांना दर्शवते. तिरुपतीतील बालाजी मंदिराप्रमाणेच केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर हेदेखील जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. पद्मनाभस्वामी मंदिर केरळच्या तिरुवनंतपूरममध्ये आहे. हे मंदिर तिथल्या रहस्यांमुळे सतत चर्चेत असते. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणेच केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिरात देखील अनेक रहस्य आपल्याला ऐकायला मिळते. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने पद्मनाभ मंदिराच्या व्यवस्थापनेची जबाबदारी त्रावणकोरच्या राजघराण्यामध्ये असल्याचे त्यांनी मान्य केले. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या मंदिरातील तळघरात असलेल्या सहा दरवाजे उघडण्यास सांगितले होते. जेव्हा तळघरातील दरवाजे सहा दरवाजे उघडले तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. तळघरातील दरवाजे सहा दरवाज्यांमधून मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, हिरे आणि इतर मौल्यवान रत्न सापडले. मात्र तिथला सातवा दरवाजा अद्यापही उघडला नाही. तेथील पुजारींच्या मते, दरवाज्यामागे अनेक गूढ आणि रहस्य आहे. या दरवाज्यावर दोन लोखंडाचे नाग आपल्याला पाहायला मिळतात जे दरवाज्याचे रक्षण करतात. जेव्हा जेव्हा हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा अनेक नाग तिथे त्या दरवाज्याचे रक्षण करताना पाहायला मिळाले. पद्मनाभस्वामी मंदिराच्या तळघरातील सातव्या दरवाज्यामागे नेमके काय रहस्य आहे जाणून घेऊया.
साडे तीन फूट उंच शेषारुढ विष्णू देवांची मूर्ती:
काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जेव्हा या मंदिरातील सहा दरवाजे उघडण्यात आले तेव्हा या तळघरातून तब्बल एक लाख ३२ हजार कोटींची संपत्ती मिळाली होती. सोबतच या तळघरामध्ये विष्णू देवांची साडेतीन फूट लांब असलेली सोन्याची मूर्ती सापडली होती. श्रीविष्णूंना विविध प्रकारचे सोने, चांदी यासोबतच मौल्यवान रत्ने अर्पण केली होती.इतकेच नाही तर याच तळघरात १८ फूट लांबीची सोन्याची चेन मिळाली होती. मंदिराच्या तळघरातील सहा दरवाज्यांमधून अपार संपत्ती मिळाल्यानंतर जेव्हा सातवा दरवाजा उडण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा तेथील अनेकजण हैराण झाले.
हेही वाचा: Secrets of Tirupati Balaji Temple: तिरुपती बालाजी मंदिरातील रहस्य ऐकताच व्हाल थक्क
सर्पराज करतात सातव्या दरवाज्याची रक्षा:
जेव्हा कधी मंदिरातील सातवा दरवाजा उडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सापाच्या दंशाने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. असे म्हणतात जर कोणी सातवा दरवाजा उघडला तर संपूर्ण जगाचा विनाश होईल आणि प्रलयदेखील येणार. असे म्हणतात की ळघरातील काही भाग शापित आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)