Ganeshotsav 2025: गेल्या बुधवारी गणेश चतुर्थी झाली. तेव्हापासून गणेश उत्सवाला सुरूवात झाली. हा उत्सव 10 दिवस चालतो. 27 ऑगस्टला लोकांनी आपल्या घरात गणपतीची स्थापना केली. आता त्यांची मूर्ती 6 सप्टेंबर रोजी विसर्जित केली जाईल. काही लोकांच्या घरात गणपती दीड दिवसाचा, काहींच्या पाच, काहींच्या सात तर काहींच्या 11 दिवसांचा असतो. जर तुम्हाला गणेशोत्सादरम्यानच्या कुठेही उंदीर दिसला तर त्यामागे एक मोठा संकेत लपलेला आहे.
उंदीर दिसण्यामागील संकेत काय?
हिंदू धर्मात अचानक कोणतीही गोष्ट दिसण्यामागे काहीतरी संकेत असतो, असे मानले जाते. त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. गणेशोत्सवादरम्यान तुम्हाला कुठेही उंदीर दिसला तर त्यामागे एक मोठा संकेत लपलेला असतो. गणेशोत्सवादरम्यान उंदीर दिसला तर त्याचा अर्थ स्पष्ट होतो की गणेशाने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. याचा अर्थ असा की जीवनातील सर्व अडथळे लवकरच दूर होतील. जर एखाद्याला पांढरा उंदीर दिसला तर तो आणखी शुभ मानला जातो. ते पाहण्याचा अर्थ असा की आता जीवनात सर्व सकारात्मक बदल होतील.
हेही वाचा: Todays Horoscope 2025: आजचा दिवस तुमच्या राशीसाठी शुभ की अशुभ? जाणून घ्या राशीभविष्य
उंदीर घराबाहेरुन जाणे हे एक चांगले लक्षण
जर तुम्हाला घराबाहेर उंदीर जाताना दिसत असेल तर त्याचा अर्थ आणखी चांगला आहे. असा उंदीर पाहण्यामागील संकेत म्हणजे तो घरातील सर्व समस्या दूर करत आहे. तसेच, तो त्या घरात सुख आणि समृद्धी आणत आहे. बरेच लोक उंदीर पाहणे अशुभ मानतात. परंतु उंदीर कोणत्या दिशेने जात आहे हे देखील खूप महत्वाचे आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)