Today's Horoscope 08 August 2025 : या राशीच्या लोकांना आज धनलाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ.
वृषभ - इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु, तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले, तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे.
मिथुन - प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. वादविवाद, दुस-यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा.
कर्क - तुम्हाला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत दक्ष राहावे लागेल. ताण तणाव आणि दडपणात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा.
सिंह - भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल.
कन्या - सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते, जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल.
हेही वाचा: Raksha Bandhan Special: कशी असावी राखी? शुभ मुहुर्त आणि योग्य पद्धत जाणून घ्या
तूळ - तुमच्या आजाराबद्दल चर्चा करणे टाळा. तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार, म्हणून इतर दुसऱ्या कामामध्ये स्वत:ला गुंतविणे श्रेयस्कर. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो.
वृश्चिक - आरोग्य एकदम चोख असेल. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकेल.
धनु - आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाळगा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
मकर - मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अतिखाणे दुसऱ्या दिवशी त्रासदायक ठरू शकते. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल.
कुंभ - मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. नातेवाईक, मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील.
मीन - कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या.