मुघलचे शासक औरंगजेब सध्या देशाच्या राजकारणामध्ये चर्चेचे नाव असून नुकताच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुघलचे शासक औरंगजेबाचे गौरव केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. इतिहासाची पाने पाहिली तर वादग्रस्त मुघल शासकांमध्ये औरंगजेबाचे नाव सर्वात मोठे आहे. औरंगजेबाने गैर-मुस्लिमांवर जिझिया करासारखे भेदभाव करणारे धोरण राबवले होते. औरंगजेबाने शीख गुरु तेग बहादूर यांचा शिरच्छेद केला होता. औरंगजेबाने गुरू गोविंद सिंग यांच्या मुलांना भिंतीत जिवंत गाडले, तर संभाजी महाराजांचे डोळे फाडून त्यांची नखे बाहेर काढण्यात आली. औरंगजेबाच्या राजवटीत भारतात शरियतच्या आधारे फतवा-ए-आलमगिरी लागू करण्यात आली होती. त्यासोबतच औरंगजेबाने मोठ्या प्रमाणात हिंदू मंदिरे नष्ट केली होती. यादरम्यान काशी आणि सोमनाथ मंदिरे नष्ट झाली आणि त्यासोबत लाखो हिंदू मारले गेले होते. त्याच्या क्रूरतेमुळे, मुघल साम्राज्यने जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडात त्याचा सर्वाधिक विस्तार करू शकले.
1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला होता. असे म्हणतात की औरंगजेबाच्या मृत्यूपूर्वी, त्याला त्याच्या गुन्ह्यांचा पश्चात्ताप झाला होता. त्यामुळे औरंगजेबाने आपले पुत्र आझम शाह आणि काम बक्श यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती. या पत्रांमध्ये औरंगजेबाने त्याच्या पापांबद्दल आणि अपयशांबद्दल उल्लेख केले. चला तर जाणून घेऊया काय होते औरंगजेबाचे 'ते' शेवटचे पत्र.
हेही वाचा: Jaya Kishori : जया किशोरी म्हणाल्या, 'रावण रेपिस्ट होता, ब्रह्मदेवाने दिलेल्या 'या' शापामुळे नाईलाजने त्याने सीतेला स्पर्श…'
राम कुमार वर्मा लिखित 'औरंगजेब्स लास्ट नाईट' या पुस्तकात औरंगजेबाच्या पत्रातील मजकुराचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये औरंगजेब आपल्या मृत्यूपूर्वी म्हणतात, 'आता मी म्हातारा आणि अशक्त झालो आहे, मी कोण आहे आणि मी या जगात का आलो, हे मला माहीत नाही. मी लोकांचे काही भले केले नाही, माझे आयुष्य असेच वाया गेले. मला भविष्याची आशा नाही, माझा ताप आता निघून गेला आहे, पण माझ्या शरीरावर फक्त त्वचा आहे असे वाटते. मी या जगात काहीही घेऊन आलो नाही, पण आता पापांचे ओझे घेऊन निघालो आहे. मला माहित नाही की अल्लाह मला काय शिक्षा देईल, मी केलेल्या सर्व दुःखांचे, मी केलेल्या प्रत्येक पापाचे परिणाम मला भोगावे लागतील. मी दुष्टात बुडालेला पापी आहे'.
औरंगजेबाने केले होते वडिलांवर अत्याचार:
औरंगजेबचे वडील शाहजहान होते. औरंगजेबानेही वडिलांवर अनेक अत्याचार केले होते. औरंगजेबाने त्याचे वडील शाहजहानला आग्रा किल्ल्यात कैद केले आणि त्याला पाण्यासाठी तळमळायला लावले.
'शाहजहानमा' या आत्मचरित्रात शाहजहान म्हणाले:
शाहजहानने 'शाहजहानमा' या आत्मचरित्रात औरंगजेबासाठी अत्यंत कठोर शब्द वापरले होते. ज्यामध्ये शाहजहानने लिहिले की, 'अल्ला असे मूल कुणाच्याही जन्माला देऊ नये'.
हेही वाचा: Baba Vanga Predicts: सटीक भविष्यवाणी करणारे बाबा वेंगा नेमकं आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती!
हिंदूंबद्दल शाहजहान म्हणाले:
शाहजहानने औरंगजेबाची तुलना आपल्या आईवडिलांची सेवा करणाऱ्या आणि मृत्यूनंतर तर्पण अर्पण करणाऱ्या हिंदूंशी केली. त्यांनी लिहिले आहे की, 'औरंगजेबापेक्षा हिंदू चांगले आहेत, जे आपल्या आईवडिलांची सेवा करतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर तर्पण देतात.
औरंगजेबाला आपले साम्राज्य आपल्या मुलांमध्ये विभागायचे होते. त्याला उत्तराधिकार संपवायचा होता, पण त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. त्याच्या मुलांमध्येही गादीसाठी युद्ध झाले. त्याच्या तिन्ही मुलांमध्ये (मुहम्मद मुअज्जल, मुहम्मद आझम आणि कमबख्श यांच्यात) वारसदारासाठी युद्ध झाले होते. युद्धामध्ये त्याचा मोठा मुलगा शहजादा मुअज्जलयाने युद्ध जिंकले आणि त्याचा भाऊ मुहम्मद आझम याचा 18 जून 1707 इ.स.वी ला जाजाऊ येथे आणि कामबक्षला हैदराबादमध्ये जानेवारी 1709 इ.स.वी मध्ये खून केला होता.
औरंगजेबाची समाधी:
औरंगजेबाचा मृत्यू 1707 मध्ये झाला होता. औरंगजेब आलमगीरला महाराष्ट्रातील संभाजीनगरजवळील (पूर्व औरंगाबादजवळील) खुलदाबाद नावाच्या छोट्या गावात बांधलेल्या समाधीमध्ये अगदी साध्या पद्धतीने दफन करण्यात आले होते. त्याची कबर कच्च्या मातीची होती, ज्यावर आकाशाशिवाय दुसरे छप्पर ठेवलेले नव्हते. याच कच्च्या थडग्यात पडलेला हा औरंगजेब आजही प्रायश्चित्ताच्या आगीत जळत अल्लासमोर येण्याची वाट पाहत आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)