Ganesh Visarjan 2025 Schedule: गणेश चतुर्थीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार, 28 ऑगस्ट 2025 रोजी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. हा दिवस विशेष मानला जातो कारण गणेशोत्सवात सर्वाधिक विसर्जन याच दिवशी केले जाते. गणेश भक्त आदल्या दिवशी दुपारी मूर्तीची स्थापना करतात आणि दुसऱ्या दिवशी दुपारी विसर्जनासाठी मूर्ती बाहेर काढतात. त्यामुळे याला दीड दिवसांचे गणेश विसर्जन असे म्हटले जाते. विसर्जन ही केवळ धार्मिक विधी नसून भावनिक क्षण देखील असतो. बाप्पांना निरोप देताना भक्तांच्या डोळ्यात पाणी येते, तरीही उत्साहात आणि भक्तिभावाने गणरायाचे विसर्जन केले जाते. गणेश विसर्जनादरम्यान, बाप्पाची मूर्ती फेकू नये, तर तिचे आदराने विसर्जन करावे.
हेही वाचा - Lord Ganesh Dream Meaning: तुम्हाला स्वप्नात गणपती दिसला, याचा अर्थ...
गणपती विसर्जन शुभ मुहूर्त
दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी अनेक शुभ वेळा सांगितल्या आहेत:
सकाळचा मुहूर्त दुपारी 12:22 ते दुपारी 3:35
दुपारचा मुहूर्त (शुभ): संध्याकाळी 5:11 ते 6:47
संध्याकाळचा मुहूर्त (अमृत, चार): 6:47 ते 9:35
29 ऑगस्ट, रात्रीचा मुहूर्त: 12:22 ते 1:46
29 ऑगस्ट, सकाळचा मुहूर्त (शुभ, अमृत): पहाटे 3:10 ते सकाळी 5:58
भक्त आपल्या सोयीप्रमाणे आणि घरातील परंपरेप्रमाणे या वेळेत गणेश विसर्जन करू शकतात.
हेही वाचा - Prayagraj Ganpati: प्रयागराजमध्ये गणेशोत्सवाची 50 वर्ष जुनी परंपरा, एक हजार मोदकांच्या नैवेद्यासह...
विसर्जनाचे महत्व
गणरायाचे आगमन हा आनंदाचा क्षण असतो, तर विसर्जनाचा दिवस थोडासा दुःखाचा असतो. हिंदू श्रद्धेनुसार, विसर्जनानंतर गणपती आपल्या पालकांजवळ कैलास पर्वतावर परत जातात. काही ठिकाणी या विधीला जीवनचक्राचे प्रतीक मानले जाते. भक्तांचा विश्वास आहे की बाप्पा आपल्या समस्या घेऊन जातात आणि नव्या सुरुवातीचे वरदान देतात. म्हणूनच विसर्जनाच्या वेळी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा गजर घुमतो.