IND vs BAN : शमी खेळणे फिक्स, हर्षित-अर्शदीप मध्ये कोणाला संधी, अशी असणार टीम इंडिया
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा दुसरा सामना आज (ता. २० फेब्रुवारी) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणार आहे. उभय संघातील या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल. बांगलादेश विरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघात अंतिम ११ मध्ये कोणत्या खेळाडूंना स्थान मिळेल, याचा आढावा आपण पाहुयात...
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अंतिम ११ मध्ये गोलंदाजीची धुरा ही मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यावर असणार आहे. याचे खेळणे जवळपास निश्चित आहे. तर वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह यांच्यापैकी दोघांना संधी मिळू शकते. हार्दिक पांड्या सहावा गोलंदाजाची भूमिका पार पाडू शकतो.
फलंदाजीत रोहित शर्मा, तुफान फॉर्मात असलेला सलामीवीर शुभमन गिल यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. याशिवाय विराट कोहली भारतीय संघाचा हुकमी एक्का आहे. यानंतर श्रेयश अय्यरचा नंबर संघात लागतो. ऋषभ पंत ऐवजी केएल राहुलला अंतिम संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. यानंतर हार्दिक, अक्षर हे अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावतील.
हेही वाचा - ICC ODI Ranking: गिल नंबर १, बाबर आझमला धक्का, ४ भारतीय खेळाडू टॉप-१० मध्ये
बांगलादेशविरुद्ध असा आहे भारताचा रेकॉर्ड
भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय सामन्यांचा इतिहास पाहता दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध ४१ सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने ३२ विजय मिळवले आहेत. तर बांगलादेशने ८ सामने जिंकले आहेत.
दुसरीकडे, बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसैन शांतो करत आहे. संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन खेळत नसल्याने बांगलादेशची बाजू कमकुवत आहे. त्यांच्या अनुपस्थितीची भरपाई जकिर अली अनिक करू शकतो.
हेही वाचा - PAK vs NZ: घरच्या मैदानावर पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी!
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ८ संघ दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. गट अ मध्ये पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर गट ब मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आहेत. प्रत्येक संघ तीन सामने खेळेल. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सेमीफायनल फेरीत प्रवेश करतील.
भारत आणि बांगलादेशचा संभाव्य संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह/हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती/कुलदीप यादव।
बांग्लादेश: नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तंजीद हसन, तौहीद हृदय/जाकिर अली अनिक, मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, मुस्ताफिजुर रहमान, नासुम अहमद, तंजीम हसन साकिब/नाहिद राणा