Cheteshwar Pujara Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बराच काळ भारतीय कसोटी संघाबाहेर असलेल्या पुजाराने आता आपल्या सुवर्ण कारकिर्दीला निरोप दिला आहे. पुजाराने स्वतः निवृत्तीबद्दल माहिती दिली आहे. पुजाराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'भारतीय जर्सी घालून, राष्ट्रगीत गाऊन आणि मैदानावर पाऊल ठेवताना प्रत्येक वेळी सर्वोत्तम प्रयत्न करणे. या सर्वांचा अर्थ शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. सर्वकाही संपले पाहिजे म्हणून मी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.'
कसोटी पदार्पण आणि कारकिर्द
चेतेश्वर पुजाराने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. त्यानंतर, चांगल्या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला. राहुल द्रविडनंतर त्याला कसोटीची भिंत म्हटले जाऊ लागले. त्याच्याकडे क्रीजवर टिकून राहण्याची अद्भुत क्षमता होती. मजबूत तंत्रामुळे गोलंदाज त्याच्या बचावात लवकर यशस्वी होऊ शकले नाहीत. पुजाराने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये शेवटचा सामना खेळला. त्यानंतर तो संघाबाहेर होता.
हेही वाचा - Virat Kohli: निवृत्ती की नवा डाव? विराटच्या तयारीने BCCI बुचकळ्यात
कसोटी सामन्यांची संख्या: 103
एकूण धावा: 7195
शतके: 19
अर्धशतके: 35
हेही वाचा - Women's World Cup 2025: खुशखबर! ICC क्रिकेट वर्ल्डकपचे काही सामने होणार महाराष्ट्रात; जाणून घ्या सुधारित वेळापत्रक
ऑस्ट्रेलियामध्ये मालिकावीर
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत 2-1 असा विजय मिळवला, ज्यामध्ये पुजाराने 521 धावा केल्या. त्याच्या चांगल्या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कारही मिळाला. चेतेश्वर पुजाराचा आपल्या कारकिर्दला निरोप म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी एक युगाचा शेवट आहे. त्याच्या सुवर्ण कारकिर्दीत त्याने भारतीय कसोटी संघाला अनेक विजय दिले. आता संघात युवा खेळाडूंसाठी नवीन संधी आहे, परंतु, पुजाराचा योगदान भारतीय क्रिकेटमध्ये सदैव आठवणीत राहील.