IND W vs AUS W: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात भारतीय महिला संघ नेहमीप्रमाणे निळ्या रंगाच्या ऐवजी गुलाबी जर्सी परिधान करणार आहे.
हेही वाचा - IND-W vs AUS-W Live Streaming: आज रंगणार भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघाचा निर्णायक सामना; थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहायचे?
यामागे एक विशेष कारण असून, स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करणे हा त्यामागचा उद्देश आहे. बीसीसीआयने एक खास व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यामध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इतर खेळाडू गुलाबी जर्सीत दिसल्या. बीसीसीआयने संदेश दिला की, 'स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय संघ आज गुलाबी जर्सीमध्ये खेळणार आहे.'
हेही वाचा - Dunith Wellalage Father's Death: श्रीलंकेचा खेळाडू दुनिथ वेल्लालेजवर कोसळला दु:खाचा डोंगर; आशिया कप सामना खेळताना मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी
भारताला पहिल्या सामन्यात 281 धावा करूनही ऑस्ट्रेलियाकडून 8 विकेटने पराभव पत्करावा लागला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने 292 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला 190 धावांत गुंडाळत 102 धावांनी मोठा विजय मिळवला. त्यामुळे मालिका रंगतदार बनली आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीनेही ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. भारताकडे आता इतिहास घडवण्याची संधी असून, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच एकदिवसीय मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.