Sunday, August 31, 2025 09:11:10 AM

Cricketer Gauhar Sultana Retirement: भारतीय महिला क्रिकेटपटू गौहर सुलतानाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

डावखुरी फिरकी गोलंदाज असलेल्या गौहरने भारतासाठी 87 मर्यादित षटकांचे सामने खेळले असून तिच्या कारकिर्दीला क्रिकेटप्रेमींनी नेहमीच कौतुकाने गौरवले आहे.

cricketer gauhar sultana retirement भारतीय महिला क्रिकेटपटू गौहर सुलतानाची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

Cricketer Gauhar Sultana Retirement: भारतीय महिला क्रिकेटपटू गौहर सुलतानाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. डावखुरी फिरकी गोलंदाज असलेल्या गौहरने भारतासाठी 87 मर्यादित षटकांचे सामने खेळले असून तिच्या कारकिर्दीला क्रिकेटप्रेमींनी नेहमीच कौतुकाने गौरवले आहे. तिने गुरुवारी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, 'अनेक वर्षे अभिमानाने, जोशाने आणि उद्देशाने भारतीय जर्सी परिधान केल्यानंतर आता माझ्या क्रिकेट प्रवासातील सर्वात भावनिक क्षणाबद्दल लिहिण्याची वेळ आली आहे. आठवणींनी भरलेले हृदय आणि कृतज्ञतेने भरलेले डोळे घेऊन मी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करते.'

गौहर सुलतानाने म्हटलं आहे की, 'हैदराबादच्या धुळीच्या रस्त्यांपासून जागतिक क्रिकेटच्या भव्य टप्प्यापर्यंतचा प्रवास स्वप्नासारखा होता. भारताचे प्रतिनिधित्व करणे, मग ते विश्वचषक असो वा आंतरराष्ट्रीय दौरे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होता. प्रत्येक विकेट, प्रत्येक डाईव्ह आणि सहकाऱ्यांसोबतचा प्रत्येक क्षण मला आज ज्या ठिकाणी घेऊन आला त्यासाठी मी सदैव ऋणी आहे.' 

हेही वाचा - Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या टीमचे नाव बदलणार? 700 कोटींच्या डीलनंतर घेतला मोठा निर्णय

गौहर सुलतानाची कारकीर्द - 

मे 2008 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण.
50 एकदिवसीय सामन्यांत 66 विकेट्स
37 टी-20 सामन्यांत 29 विकेट्स.
महिला प्रीमियर लीगमध्ये दोन हंगाम यूपी वॉरियर्सकडून खेळली.
भारतासाठी शेवटचा सामना 2014 मध्ये महिला टी-20 विश्वचषकात महत्त्वपूण खेळी. 

हेही वाचा - हुश्श..! किती धावायचं? टीम इंडियाच्या खेळाडूंनी फिटनेससाठी Bronco Test, 1200 मीटर फक्त इतक्या मिनिटात गाठायचं!

गौहर सुलतानाच्या फिरकी गोलंदाजीने भारताला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला आहे. 2014 नंतर ती राष्ट्रीय संघात दिसली नसली, तरी देशांतर्गत आणि लीग क्रिकेटमध्ये तिने सातत्याने आपली कामगिरी दाखवली. आता तिच्या निवृत्तीनंतर भारतीय महिला क्रिकेटला एक अनुभवी गोलंदाज गमवावा लागणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री