Sunday, August 31, 2025 06:48:22 AM

जसप्रीत बुमराह IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? मोठा खुलासा!

Jasprit Bumrah injury update : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी चिंताजनक बातमी आहे.  जसप्रीत बुमराह अजून शंभर टक्के तंदुरुस्त नाही.

जसप्रीत बुमराह ipl 2025 मध्ये खेळणार की नाही मोठा खुलासा
जसप्रीत बुमराह IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? मोठा खुलासा!

Jasprit Bumrah injury update : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो ICC Champions Trophy 2025 स्पर्धेत ही खेळू शकला नाही. आता हीच दुखापत त्याला IPL 2025 स्पर्धेच्या काही सामन्यांपासून दूर ठेवणार आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही मोठी चिंताजनक बातमी आहे.  

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह सध्या बंगळुरूमध्ये बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंस मध्ये उपचार घेत आहे. दुखापतीत सुधारणा होत असली तरी तो अजून शंभर टक्के तंदुरुस्त नाही. त्यामुळं आयपीएलच्या सुरुवातीच्या आठवड्यात तो खेळू शकणार नाही. BCCI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराहने हळूहळू गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. पण त्याला संपूर्ण ताकदीने गोलंदाजी करायला वेळ लागणार आहे.

हेही वाचा -  Vinesh Phogat: विनेश फोगाटच्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा, सोशल मीडियावर दिली 'गुड न्यूज'

मुंबई इंडियन्सचा हा खमक्या गोलंदाज एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पूर्णतः तंदुरुस्त होऊन मैदानात परतू शकतो. त्यामुळे मुंबई संघाला त्याच्या अनुपस्थितीत सुरुवातीच्या ३ ते ४ सामन्यांत त्याचा पर्याय शोधावा लागणार आहे.

हेही वाचा - Mohammed Shami: रोजा दरम्यान मोहम्मद शमीने एनर्जी ड्रिंक पिल्यामुळे वाद! जाणून घ्या

बुमराहच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी आक्रमणावर मोठा परिणाम पडू शकतो. तो मुंबईचा अनुभवी गोलंदाज असून डेथ ओव्हर्समध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असते. जर तो सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नसल्यास मुंबई इंडियन्सला त्याच्या जागी योग्य पर्याय शोधावा लागेल. संघाकडे ट्रेंट बोल्ट, मुजीबूर रहमान, दीपक चहर यांसारखे वेगवान गोलंदाज असले तरी बुमराहचा अनुभव आणि नियंत्रण वेगळ्या स्तरावर आहे.

IPL 2025 च्या पहिल्या आठवड्यानंतर बुमराह पूर्णतः तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तो मैदानात परतू शकतो. पण तो लगेच पूर्ण क्षमतेने खेळू शकेल का, याबाबत शंका आहे. मुंबई इंडियन्स व्यवस्थापन आणि बीसीसीआय बुमराहच्या फिटनेसवर बारीक लक्ष ठेवून आहेत. 

IPL 2025 साठी मुंबई इंडियन्सचा संघ -

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, रोबिन मिंज, रयान रिकेल्टन, बेवोन जँकब्स, नमन धीर, विल जॅक्स, मिचेल सेंटनर, राज अंगद बावा, कर्ण शर्मा, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंदुलकर, दीपक चाहर, अश्विनी कुमार, रीस टोप्ले, व्यंकटा सत्यनारायण, श्रीजीत कृष्णन, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट

 


सम्बन्धित सामग्री