Tuesday, September 16, 2025 07:32:56 PM

Team India Jersey Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा टायटल स्पॉन्सर! जर्सीवर दिसणार 'या' कंपनीचे नाव

टीम इंडिया आता त्यांच्या जर्सीवर अपोलो टायर्सचे नाव घेऊन मैदानात उतरणार आहे. बीसीसीआय आणि कंपनी यांच्यातील करार जवळपास पूर्ण झाला आहे.

team india jersey sponsor टीम इंडियाला मिळाला नवा टायटल स्पॉन्सर जर्सीवर दिसणार या कंपनीचे नाव

Team India Jersey Sponsor: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) अखेर नवा टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. वृत्तानुसार, टीम इंडिया आता त्यांच्या जर्सीवर अपोलो टायर्सचे नाव घेऊन मैदानात उतरणार आहे. बीसीसीआय आणि कंपनी यांच्यातील करार जवळपास पूर्ण झाला असून, या कराराअंतर्गत अपोलो टायर्स प्रत्येक सामन्यासाठी 4.5 कोटी रुपये देणार आहे.

हेही वाचा - BCCI On No Handshake Controversy: 'असा कायदा नाही...'; हस्तांदोलन करण्याच्या वादावर बीसीसीआयचे प्रत्युत्तर

ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 लागू झाल्यानंतर ड्रीम 11 सोबतचा करार संपुष्टात आला. याआधी बीसीसीआय आणि ड्रीम 11 यांच्यात 358 कोटी रुपयांचा करार झाला होता, जो 2023 ते 2026 पर्यंत चालणार होता. मात्र, नव्या कायद्यानुसार फॅन्टसी गेमिंग अॅप्सना बंदी घालण्यात आली असून, त्यामुळे बीसीसीआयला नवा टायटल स्पॉन्सर शोधावा लागला. नव्या टायटल स्पॉन्सरमुळे बीसीसीआयच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार असून, भारतीय क्रिकेटसाठी ही एक महत्त्वाची घडामोड मानली जाते.

हेही वाचा - Speed Skating World Championship 2025 : स्पीड स्केटिंग वर्ल्ड चॅम्पियशिपमध्ये आनंदकुमार वेलकुमारने जिंकले भारताचे पहिले सुर्वणपदक

दरम्यान, आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया कोणत्याही टायटल स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात यूएईवर 9 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर, पाकिस्तानविरुद्धही टीम इंडियाने 7 विकेट्सने बाजी मारली. गोलंदाजीत कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण यांनी जबरदस्त कामगिरी केली असून, फलंदाजीत अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव चमकदार फॉर्ममध्ये आहेत.


सम्बन्धित सामग्री