Wednesday, August 20, 2025 09:17:36 PM

'या' खेळाडूने घेतली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

71 सामन्यात 1491 धावा आणि 48 बळी नावावर

या खेळाडूने घेतली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 देश सहभागी होणार आहेत. सर्व देशांनी संघदेखील जाहीर केले आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संघात निवड झाली असूनदेखीलएक खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. 

ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनीसने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषीत केली आहे. स्टोइनीस ऑस्ट्रेलियासाठी 1 एकदिवसीय वर्ल्ड कप आणि 3 टी 20 वर्ल्ड कप खेळाला आहे. 35 वर्षीय स्टोइनीस ऑस्ट्रेलियासाठी 71 एकदिवस सामने खेळला आहेत, या 71 सामन्यात त्याने 1495 धावा केल्या आणि त्याचसोबत त्याने 48 बळीदेखील घेतले आहे. तो 2023 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा भागदेखील होता. स्टोइनिसने इंग्लंडविरुद्ध 2015 या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होत. त्याची न्यूझीलंडविरुद्धची 146 धावांची खेळी ही ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या इतिहासातील एक उत्कृष्ट खेळी  मानली जाते. 
मार्कस स्टोइनीसची टी 20 स्पेसिऍलिस्ट म्हणून जगभर ख्याती आहे. तो जगभरात जाऊन सगळ्या टी 20 लीग खेळतो. भारतातदेखील स्टोइनीस प्रसिद्ध आहे. तो 2026 पासून आयपीएल खेळात आहे. त्याने पंजाब, दिल्ली, बंगळुरू आणि लखनौ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. स्टोइनिसने आयपीएलमध्ये 96 सामने खेळले आहे. 96 सामन्यात स्टोइनिसने 1314 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये स्टोइनिसच्या नावावर 43 बळीदेखील आहेत. 


 


सम्बन्धित सामग्री