अलीकडे अनेक मोबाईल ॲप्स अशा परवानग्या मागतात ज्यांची त्यांना आवश्यकता नसते. त्यामुळे तुमच्या फोनची गोपनीयता सेटिंग्स तपासणे आवश्यक आहे. तुमच्या फोनचा कॅमेरा, मायक्रोफोन, स्थान, संपर्क आणि इतर संवेदनशील डेटा अनावश्यक रीत्या मोबाईल मध्ये येण्यापासून रोखू शकतो. जर एखाद्या ॲपने अधिकच्या परवानग्या मागितल्या तर ते ॲप न वापरता त्याला पर्यायी ॲप वापरण्याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. हॅकर्सपासून वाचायचं असेल तर फोन वापरताना खालील गोष्टींची नक्की काळजी घ्या...
पडताळणी न केलेले अॅप्स आणि लिंक्स टाळा -
गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअर सारख्या विश्वसनीय स्त्रोतांकडूनच अॅप्स डाउनलोड करा. फिशिंग हल्ले आणि मालवेअर संसर्ग टाळण्यासाठी ईमेल, मजकूर किंवा संदेशांमधील संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणे टाळा.
हेही वाचा - आता AI Death Clock सांगणार तुमचा मृत्यू कधी होणार; काय आहे 'एआय डेथ क्लॉक'? जाणून घ्या
सार्वजनिक वाय-फाय वापरताना काळजी घ्या -
सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क अनेकदा असुरक्षित असतात. त्यामुळे अशावेळी तुमचा फोन हॅक होण्याची जास्त शक्यता असते. सार्वजनिक नेटवर्क वापरून संवेदनशील खात्यांमध्ये प्रवेश करणे टाळा. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) वापरून तुमचा इंटरनेट ट्रॅफिक एन्क्रिप्ट केल्याशिवाय अशा महत्त्वाच्या गोष्टी फोनमध्ये लॉग इन करू नका.
हेही वाचा - Google Chrome वापरणाऱ्यांनो सावधान! भारत सरकारने दिलेल्या 'या' इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान
गरज नसताना ब्लूटूथ आणि लोकेशन बंद करा -
ब्लूटूथ आणि लोकेशन सेवा सक्षम ठेवल्याने तुम्हाला ट्रॅकिंग आणि संभाव्य सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही त्याचा वापर करत नसाल, तर ते बंद ठेवा. केवळ आवश्यक असेल तेव्हाच अॅप्सना तुमचे स्थान अॅक्सेस करण्याची परवानगी द्या.
ब्राउझरचा वापर करा -
गुगल क्रोमऐवजी, ब्रेव्ह किंवा फायरफॉक्स फोकस सारखे गोपनीयता-केंद्रित ब्राउझर वापरण्याचा विचार करा.
क्लाउड बॅकअपबाबत सावधगिरी बाळगा -
क्लाउड बॅकअप संवेदनशील माहिती साठवू शकतात. जर तुम्ही ते वापरत असाल तर ते एन्क्रिप्टेड असल्याची खात्री करा.