या आठवड्यात झालेल्या पावसाने अक्षरश: सर्वांना झोडपून काढले आहे. याचा परिणाम अनेक घटकांवर झालेला बघायला मिळाला. आता गणपती सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच फुलांचा तुटवडा झाल्याचे समोर आले आहे.
अतिवृष्टीचा फुलांच्या शेतीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. त्यामुळे प्रमुख फुलबाजारांत फुलांची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्यामुळे बाजारपेठांमध्ये फुलांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
हेही वाचा - ‘..पाकिस्तान अजूनही डंपर आहे, हे त्यांचं अपयश’, Rajnath Singh यांनी असीम मुनीर यांच्या 'त्या' विधानाची उडवली खिल्ली
समोर आलेल्या माहितीनुसार, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतांमध्ये पाणी साचल्याने झेंडू, मोगरा, गुलाब, चाफा यांसारख्या फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गणपतीत साधारण झेंडूचा प्रति किलो 160 ते 200 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Zero Toll Tax: आनंदाची बातमी! 'या' पुलावर टोल पूर्णपणे फ्री; फक्त 'या' वाहनांनाच मिळणार सूट
दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी शेतकऱ्यांकडून बाजारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत असते. मात्र यंदा पावसामुळे परिस्थिती वेगळी असून विक्रेत्यांना फुलांचा तुटवडा भासणार आहे. दादर फुलबाजारात दररोज फुलांचे 50 ट्रक येतात. मात्र, दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने फुले भिजल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात पाठवता येत नाहीत.