Sunday, August 31, 2025 06:26:30 AM

CAR LAUNCH 2025: कारप्रेमींसाठी खुशखबर! २०२५ मध्ये लाँच होणार 'या' नव्या कार. जाणून घ्या

car launch 2025 कारप्रेमींसाठी खुशखबर २०२५ मध्ये लाँच होणार या नव्या कार जाणून घ्या

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजारात अनेक नवनवीन कार्स भारतामध्ये लाँच होत आहेत. या कारमध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या आकर्षक सुविधादेखील पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे कारप्रेमींमध्ये आपल्याला उत्सुकता पाहायला मिळते. अनेक ठिकाणी आपली आवडती कार खरेदी करण्यासाठी अनेकजण विविध कार शोरूमला भेट देत आहेत. अशातच काही नवे कार भारतामध्ये लाँच झाले आहेत. हे आहेत नवीन कार जे ज्याला खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. 

1. KIA SYROS:

KIA SYROS कार लवकरच भारतामध्ये लाँच होणार असून सूत्रांनुसार ही कार 18 मार्च 2025 पर्यंत लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारचे मायलेज 18 ते 20 किमी प्रति लिटर असेल. त्यासोबतच या कारच्या टाकीची क्षमता 45 लिटर पर्यंत असेल. त्यासोबतच या कारमध्ये एअरबॅगची सुविधादेखील आपल्याला पाहायला मिळते. कारची लांबी 4,615 एमएम असून कारची रुंदी 1,875 एमएम असणार आहे, त्यासोबतच या कारची उंची 1,715 असण्याची शक्यता आहे. मिळ्यालेल्या माहितीनुसार या कारची किंमत साधारण 9 लाख ते 17 लाख पर्यंत असू शकते. 


2.  BYD SEALION 7: 
BYD SEALION 7 या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार इलेक्ट्रॉनिक असून या कारचे मायलेज 542 ते 567 प्रति फुल चार्ज असेल. या कारची लांबी 4830 एमएम असून या कारची रूंदी 1925 एमएम आहे आणि या कारची उंची 1620 एमएम असेल. त्यासोबतच या कारमध्ये आपल्याला नवेनवे फीचर्स पाहायला मिळणार असून लवकरच ही कार भारतामध्ये लॉंच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारची किंमत 48.9 लाख पासून ते 54.9 लाख पर्यंत असेल. 

3. RENAULT KIGER: 

RENAULT KIGER या कारची किंमत 6 लाख ते 11 लाख पर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यासोबतच या कारचे मायलेज 20 किमी प्रति लिटर असेल. त्यासोबतच या कारमध्ये एअरबॅगची सुविधा असून या कारच्या टाकीची क्षमता 40 लिटर पर्यंत असेल. लवकरच ही कार भारतामध्ये प्रवेश करणार असून या कारसाठी प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळत आहे. 


4. HYUNDAI CRETA EV:

HYUNDAI CRETA EV या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ही कार पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असून या कारची लांबी 4340 एमएम असून या कारची 1790 एमएम रूंदी आहे आणि 1655  एमएम या कारची उंची असण्याची शक्यता असेल. लवकरच ही कार  भारतामध्ये प्रवेश करणार आहे.

(Disclaimer - शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)


सम्बन्धित सामग्री