Thursday, August 21, 2025 07:06:21 PM

RAM म्हणजे काय? स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी याची चौकशी करणं का आहे महत्त्वाचं? जाणून घ्या

तुम्ही दीर्घकाळ चांगले काम करणारा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.

ram म्हणजे काय स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी याची चौकशी करणं का आहे महत्त्वाचं जाणून घ्या
RAM
Edited Image

Smartphone Buying Guide: फोन किंवा लॅपटॉवर काम करणाऱ्यांसाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोनमधील RAM संदर्भात काही खास गोष्टी सांगणार आहोत. तुम्ही दीर्घकाळ चांगले काम करणारा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. तथापी, स्मार्टफोनमध्ये फक्त जास्त रॅम असल्याने तो फास्ट चालणार नाही तर, तुमच्या फोनचा प्रोसेसर देखील मजबूत असला पाहिजे. अॅपल आयफोन कमी रॅम असूनही, त्याच्या शक्तिशाली प्रोसेसरमुळे जलद काम करतो. सध्या AI तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. जर तुम्हालाही ही रॅम काय आहे हे माहित नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला रॅमशी संबंधित सर्व माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुमचा पुढचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप खरेदी करताना तुम्ही किती रॅमचा मोबाईल खरेदी करावा? हे समजण्यास तुम्हाला मदत होईल. 

हेही वाचा Google Pay मध्ये येणार AI फीचर; आता बोलूनही करता येणार UPI पेमेंट

रॅम म्हणजे काय?

रँडम अ‍ॅक्सेस मेमरी (RAM) तुमच्या फोन किंवा लॅपटॉपच्या तात्पुरत्या मेमरीप्रमाणे काम करते. रॅम तुम्ही त्या क्षणी वापरत असलेला डेटा आणि अॅप्स तात्पुरते साठवते जेणेकरून तुमचे डिव्हाइस त्यांना जलद अॅक्सेस करू शकेल आणि त्यांना पुन्हा रीलोड करावे लागणार नाही. जेव्हा तुम्ही एखादे अॅप किंवा फाइल उघडता तेव्हा ते RAM मध्ये लोड होते आणि तुम्ही ते वापरत असताना ते तिथेच राहते.

रॅम जास्त असेल तर होईल फायदा - 

फोन किंवा लॅपटॉपमध्ये अधिक रॅम असल्याने, डिव्हाइस जलद काम करते. तसेच एकाच वेळी तुमच्या डिव्हाईसमध्ये अनेक अॅप्स सहजतेने चालतात. त्याच वेळी, जर मेमरी पूर्ण भरली तर सिस्टम मंद होऊ शकते. रिअल-टाइममध्ये डेटा प्रक्रिया करणाऱ्या एआय अॅप्सना त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अधिक मेमरीची आवश्यकता असते. स्मार्टफोनची रॅम क्षमता गीगाबाइट्स (GB) मध्ये मोजली जाते, ज्यामध्ये सामान्यतः 2GB ते 12GB किंवा त्याहून अधिक पर्याय असतात. जास्त रॅम असल्याने तुमचा फोन अनेक अॅप्स आणि कामे लॅग किंवा स्लोडाउनशिवाय चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. 

हेही वाचा - एलोन मस्क AI च्या जगात आणणार नवी क्रांती; Grok 3 लाँचसाठी सज्ज! ChatGPT आणि Gemini साठी ठरू शकते मोठे आव्हान

किती जीबी रॅम सर्वोत्तम आहे?

तुमच्या फोनची रॅम क्षमता तुम्ही तो किती वेळा आणि कसा वापरता यावर अवलंबून असते. आजकाल स्मार्टफोनमध्ये कमीत कमी 4 जीबी रॅमची आवश्यकता असते. जे कॉलिंग, मेसेजिंग, ईमेल तपासणे आणि सामान्य ब्राउझिंगसाठी पुरेसे आहे. जर तुम्ही सामान्य वापरकर्ता असाल तर 6 जीबी ते 8 जीबी रॅम असलेला फोन सर्वोत्तम असेल. यामुळे तुम्हाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय मल्टीटास्किंग, कॅज्युअल गेमिंग आणि फोटो-व्हिडिओ कॅप्चरचा आनंद घेता येईल. जर तुम्हाला जास्त मल्टीटास्किंग आणि हाय-ग्राफिक्स गेमिंग करायचे असेल तर 8 जीबी किंवा त्याहून अधिक रॅम चांगले राहील.
 


सम्बन्धित सामग्री