Sunday, August 31, 2025 09:11:14 AM

Viral Video : टक्कल केल्यावरही किती सुंदर दिसतेय नवरी! धाडसी निर्णय घेत विग घालण्याचं टाळलं; तब्बल 4 कोटी व्ह्यूज

Indian bride with bald head look : एका भारतीय वधूने तिच्या लग्नाच्या दिवशी केसांचा विग न वापरण्याचा निर्णय घेतला. स्वत:चे नैसर्गिक रूप स्वीकारत ताठ मानेनं ती लग्नमंडपात उपस्थित झाली.

viral video  टक्कल केल्यावरही किती सुंदर दिसतेय नवरी धाडसी निर्णय घेत विग घालण्याचं टाळलं तब्बल 4 कोटी व्ह्यूज

Indian bride bald look : लग्न हा प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. त्यामुळे या दिवशी आपण सर्वात सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. लग्नामध्ये ड्रेस, मेकअप किंवा हेअरस्टाईल सर्वकाही नववधूला परफेक्ट हवे असते. सुंदर दिसणे, चांगले कपडे परिधान करणे आणि लग्नात फॅन्सी हेअरस्टाईल करणे म्हणजे सुंदरता अशी व्याख्या वर्षानुवर्षांपासून समाजात रुजलेली आहे. यामुळे, सावळा रंग, चष्मा, अकाली पांढरे झालेले केस, एखाद्या अपघाताची खूण, व्यंग आदी लपवण्यासाठीच सर्व प्रयत्न केले जातात. पण स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारणारे लोक कमीच असतात. अशाच एका धाडसी वधू-वरांची ही गोष्ट!

या धाडसी तरुणीने स्वतःच्या मनातला संघर्ष संपवून टाकल्यामुळे लोकांना आपोआपच तिला 'वाहवा' म्हणणे भाग पडले आहे. अमेरिकेत राहणारी कंटेंट क्रिएटर नीहर सचदेवा हिने तिच्या लग्नाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक तरुण-तरुणींना सकारात्मक दृष्टीकोन आणि प्रेरणा मिळत आहे. अलोपेसियाचे निदान झालेल्या नीहरच्या या निर्णयाचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

अलोपेसियाचे निदान झालेल्या नवरीने उचलले धाडसी पाऊल
अलोपेसिया ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामुळे केस गळतात आणि अनेकदा टाळूवर टक्कल पडते. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती चुकून केसांच्या मुळांवर हल्ला करते, तेव्हा केस गळू लागतात. तेव्हा ही स्थिती उद्भवते.

हेही वाचा - Viral News : नवरदेवाने स्वत:च्या लग्नात ‘या’ गाण्यावर केलं नृत्य; मुलीच्या वडिलांनी लग्नच मोडलं!

टक्कल स्वीकारून केले लग्न
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, नीहरने सुंदर लाल लेहेंगा आणि स्टेटमेंट ज्वेलरी परिधान केली आहे. तिच्या डोक्यावर कोणताही केसांचा वीग लावलेला दिसत नाही. उलट, टक्कल केलेले असूनही ती अत्यंत आत्मविश्वासाने एकेक पाऊल टाकताना दिसत आहे. तिचा भावी पती अरुण व्ही. गणपतीयाच्याकडे ती चालत जाताना दिसते. तो तिच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहत आहे. ते एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. हा हृदयस्पर्शी क्षण पाहून पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येणे सहाजिक आहे. आता पर्यंत या व्हिडिओला ४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा - राहुल द्रविडची रिक्षाचालकाशी भररस्त्यात वादावादी; कारला रिक्षाची धडक लागल्याने नाराज, VIDEO व्हायरल

नीहरने सांगितला तिचा प्रवास
नी पौबरोबर केलेल्या पॉडकास्टमध्ये बोलताना नीहरने तिचा प्रवास सांगितला. तिच्या आजाराचा तिच्या बालपणावर कसा परिणाम झाला याबद्दलही सांगितले. ती म्हणाली की, “कधीकधी, माझ्या डोक्यावर केस असायचे. पण नंतर माझ्या एका भुवयीवरील केस गळून पडू लागले. खूप दिवस माझे सर्व केस होते. पण माझ्याकडे भुवया नव्हत्या आणि तेव्हा मी कदाचित 5 ते 7 वयोगटात होते. मी नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात चांगली होते आणि मला वाटते की,”जेव्हा मी विग घालायला सुरुवात केली तेव्हा माझे गुण कमी झाले. कारण, आता मी वर्गात लक्ष देत नव्हते. मी ‘माझ्या केसांचा मागचा भाग ठीक आहे का?’ किंवा ‘मला माझा विग कुठल्या बाजूने खाली खेचण्याची गरज आहे का?’ यावर लक्ष देत होते. विग घालणे हा माझ्यासाठी चांगला पर्याय ठरला नाही. मी कोणताही वैद्यकीय उपचार घेऊ शकत नाही आणि म्हणून मी माझे केस पूर्ण काढण्याचा निर्णय घेतला आणि हा कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता,” नीहर म्हणाली.


सम्बन्धित सामग्री