Monday, September 01, 2025 04:01:58 PM

तोलामोलाचं स्थळ हवं! 500 कोटींच्या मार्केट कॅपवाल्या वधूंसाठी मारवाडी-गुजराती वर पाहिजे! लग्नासाठी धमाकेदार जाहिरात

मुंबईतील एका व्यावसायिक कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जाहिरातीची सोशल मीडियावर चर्चेा सुरू आहे. मुलीचे शिक्षण-व्यवसायाची माहिती देण्याऐवजी कुटुंबाने त्यांच्या व्यवसायाची मार्केट व्हॅल्यू दिली आहे.

तोलामोलाचं स्थळ हवं 500 कोटींच्या मार्केट कॅपवाल्या वधूंसाठी मारवाडी-गुजराती वर पाहिजे लग्नासाठी धमाकेदार जाहिरात

Marwari-Gujarati Dulha: मारवाडी-गुजराती दुल्हा : सोशल मीडियावर मुंबईतील एका व्यावसायिक कुटुंबाने स्वतःच्या मुलींच्या लग्नासाठी दिलेली जाहिरात चर्चेत आली आहे. जाहिरातीत मुलीची माहिती देण्याऐवजी, व्यावसायिक कुटुंबाने त्यांच्या सांपत्तिक स्थितीचा आणि व्यावसायिक उलाढालीचा उल्लेख केला आहे. ही जाहिरात त्यांच्या कंपनीच्या उलाढालीचा संदर्भ किंवा थोडक्यात अंदाज देते. ज्यामुळे ही जाहिरात चर्चेत आली आहे.

मुंबईतील एका व्यावसायिक कुटुंबाच्या लग्नाची अनोखी जाहिरात सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या जाहिरातीत, मुलीची उंची, शिक्षण किंवा व्यवसाय अशी सामान्य माहिती देण्याऐवजी, कुटुंबाने त्यांच्या व्यवसायाचा आकार नमूद केला आहे. असे लिहिले आहे की, 500 कोटींहून अधिक बाजारमूल्य असलेली कंपनी असलेले एक कुटुंब त्यांच्या 28 वर्षांच्या मुलीसाठी मारवाडी-गुजराती वराच्या शोधात आहे. मुंबईतील एका व्यापारी कुटुंबाने वर्तमानपत्रात लग्नासाठी ही जाहिरात दिली होती. रेडिटवर शेअर झाल्यानंतर ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मार्केट कॅप हा शब्द सामान्यतः कंपनीच्या शेअर्सच्या एकूण मूल्यासाठी वापरला जातो. त्यामुळे लग्नाच्या जाहिरातीमध्ये त्याचा वापर पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि विविध मजेदार प्रतिक्रिया देऊ लागले.

हेही वाचा - स्वत:च्या सासूबाईंसाठी रिक्षाच्या मागे लिहिला भन्नाट मेसेज; नेटिझन्सनी दिली दाद

लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या
या जाहिरातीवर लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी लिहिले आहे की, समान आर्थिक स्थितीतील मुलगा शोधण्याचा हा एक मार्ग आहे. गेल्या वर्षीही मेरठमधील एका गुंतवणूकदाराची जाहिरात त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे व्हायरल झाली होती. त्याने दावा केला की तो दरवर्षी 29लाख रुपये कमवतो आणि त्याचे उत्पन्न दरवर्षी 54 टक्के चक्रवाढ दराने वाढत आहे. जाहिरातीत त्या माणसाच्या दिसण्याचा आणि जातीचा उल्लेख होता, पण संभाषण अचानक त्याच्या आर्थिक स्थितीकडे वळले होते.

कुटुंबाचा उद्देश काय आहे?
मुंबईतील व्यापारी कुटुंबे मारवाडी आणि गुजराती वरांना प्राधान्य देण्यामागील कारण असे मानले जाते की, कुटुंबाला त्यांच्या मुलीचा हात अशा व्यक्तीच्या हातात द्यायचा असतो, जो त्या कुटुंबाच्या व्यवसाय सांभाळण्यासह या व्यवसायाला भविष्यात आणखी वाढवू शकेल. मुंबईच्या आर्थिक क्षेत्रात मारवाडी आणि गुजराती समुदायांचे वर्चस्व आहे. काहीही असो, ही जाहिरात व्हायरल झाली आहे. मार्केट कॅपचा उल्लेख सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या जाहिरातीमध्ये अनेक कुटुंबातील मुलींसाठी मारवाडी गुजराती वरांची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा - डथड भांडी पडण्याचा आवाज आला.. पाहते तर काय.. स्वयंपाकघरात होता विषारी साप; मग या महिलेनं काय केलं पाहा..


सम्बन्धित सामग्री