Sunday, August 31, 2025 09:11:19 AM

Women's day 2025: पुणे मेट्रोकडून महिलांसाठी खास गिफ्ट! वन डे पास फक्त २० रुपयात

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुण्यातील महिलांसाठी पुणे मेट्रोने खास गिफ्ट दिले आहे. हा गिफ्ट पुण्यातील महिला प्रवाशांसाठी असून हा गिफ्ट 1 मार्च ते 8 मार्च या कालावधी पर्यंत मर्यादित असेल.

womens day 2025 पुणे मेट्रोकडून महिलांसाठी खास गिफ्ट वन डे पास फक्त २० रुपयात

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुण्यातील महिलांसाठी पुणे मेट्रोने खास गिफ्ट दिले आहे. खरंतर या कार्डची किमंत 118 रूपये आहे, मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुण्यातील महिलांसाठी हा पास  केवळ 20 रूपयांमध्ये महिलांना उपलब्ध होणार आहे. हा गिफ्ट पुण्यातील महिला प्रवाशांसाठी असून हा गिफ्ट 1 मार्च ते 8 मार्च या कालावधी पर्यंत मर्यादित असेल. त्यासोबतच, हा पास पुण्यातील सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असेल. त्यामुळे महिला दिनानिमित्त महिलांसाठी प्रवास आणखी सोप्पं होणार असून पुण्यातील महिलांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

 

हेही वाचा: Pune Budget 2025:पुणे महानगरपालिकेसाठी ₹12,618 कोटींचा अर्थसंकल्प सादर
 


पुण्यातील महिला प्रवाशांसाठी खास गिफ्ट:

पुणे मेट्रोचा नियमित वन डे पास 118 रुपये आहे. परंतु, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महिला प्रवाश्यांसाठी हा पास केवळ 20 रुपयामध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. पुणे मेट्रोने हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे महिला प्रवाश्यांसाठी आता प्रवास करणे आणखी सोप्पे झाले आहे. 


रिचार्ज करणे देखील सोपे:

मेट्रोमध्ये जाताना कार्ड स्वाइप केल्यास, तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळतो. अशातच, आता रिचार्ज करणे देखील सोपे आहे. हे कार्ड सर्व मार्गांवर चालते आणि हे कार्ड इको-फ्रेंडली देखील आहे. त्यामुळे महिलांनी या कार्डचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पुणे मेट्रोतर्फे करण्यात आले आहे. 1 ते 8 मार्च दरम्यान मेट्रोतून प्रवास करताना सोशल मीडियावर #SheMovesWithMetro हा हॅशटॅग देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 

हेही वाचा: पुण्याहून तीन मुली निघाल्या दुबईला; चेकिंग करतांना धक्कादायक बाब आली समोर


खास गिफ्टचा कालावधी:

पुण्यातील महिला प्रवाश्यांसाठी हे गिफ्ट 8 दिवसांसाठी म्हणजे 1 मार्चपासून 8 मार्चपर्यंत मर्यादित असेल. याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आपल्या सोबत ठेवावे. हा पास केवळ 1 दिवसासाठी वैध असेल.

 

महिलांसाठी प्रवास होणार आरामदायी:

महिलांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास मिळावा, यासाठी खास पुणे मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या गिफ्टमुळे जास्तीत जास्त महिला मेट्रो प्रवासाचा फायदा घेऊ शकतात.


सम्बन्धित सामग्री