आजकाल युनाइटेड स्टेट्स डॉलर आणि अरब अमिरात डॉलरची यांच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांना आपण कमी किंमतीत कुठे फिरायला जावे हा प्रश्न पडला आहे. अशातच जगात काही असेदेखील देश आहेत जिथे भारताचा १ रुपया तेथील २९६ रुपये इतके आहे. त्यामुळे जर तुमचे बजेट कमी असेल तर या ठिकाणाला भेट दिल्यावर श्रीमंताची अनुभूती करायला मिळेल.
1 - व्हिएतनाम:
निसर्गाच्या कुशीत असलेला व्हिएतनाम देश दक्षिण- पूर्व दिशेला आहे. हा देश सुंदर निसर्गासाठी, तेथील खाद्यसंस्कृतीसाठी आणि परंपरेसाठी जगप्रसिद्ध आहे. माहितीनुसार भारताचा 1 रुपया व्हिएतनाम देशामध्ये तब्बल 294.55 व्हिएतनामी डोंग इतके आहे. त्यामुळे इथे आल्यावर तुम्हाला श्रीमंत असल्यासारखे वाटू लागेल. हनोई, हा गिआंग, हॅलोंग, आणि होई एन व्हिएतनाममधील प्रसिद्ध ठिकाण आहे.
2 - लाओस:
लाओस देश आशियातील दक्षिण- पूर्व दिशेला आहे. हा देश त्याच्या नैसर्गिक सुंदरतेसाठी, तेथील आकर्षक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. भारताचा 1 रुपया लाओस देशामध्ये 249.45 लाओटियन किप एवढे आहे. येथील निसर्ग, स्वच्छ नदी आणि येथील परंपरा पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. लाओसमधील व्हिएन्टिन, वांग व्हिएंग, लुआंग प्रबांग ठिकाण प्रसिद्ध आहे.
3 - साऊथ कोरिया:
साऊथ कोरिया त्याच्या तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. येथील कोरियन ड्रामा आणि पॉप म्युजिक जगभरात प्रसिद्ध आहे. भारताचा 1 रुपया साऊथ कोरिया देशामध्ये 16.53 साऊथ कोरियन वोन आहे. ग्यॉंगबोकगंग महाल, म्यॉंगडोंग शॉपिंग स्ट्रीट, नामसान टॉवर, इन्सादोंग, जेजू बेट, बुसान शहर, हॉलसान पर्वत, सेओंगसान इलचुलबोंग शिखर, जगलची माछी बाजार, आणि हेउंडे बीच असे अनेक ठिकाण पाहण्यासाठी जगभरातून अनेक प्रवासी इथे भेट देतात.
4 - कंबोडिया:
कंबोडिया त्याच्या पौराणिक वास्तुकलेसाठी आणि इतिहासासाठी जगप्रसिद्ध आहे. भारताचा 1 रुपया कंबोडिया देशामध्ये 46.09 कंबोडियन रियाल इतके आहे. माहितीनुसार कंबोडिया देशातील अंकोरवाट हे मंदिर जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. त्यासोबतच हे जगातलं सर्वात मोठे धार्मिक स्मारक म्हणून देखील प्रसिद्ध आहे. हे मंदिर कंबोडिया देशाच्या अंकोरमध्ये पाहायला मिळेल.