Friday, September 19, 2025 02:52:05 PM

Earthquake In Russia: रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर 7.8 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा जारी

रशियन सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओंमध्ये घरांतील फर्निचर, लाईट फिक्स्चर जोराने हलताना दिसत आहेत.

earthquake in russia रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर 78 तीव्रतेचा भूकंप त्सुनामीचा इशारा जारी

Earthquake In Russia: रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर शुक्रवारी पहाटे 7.8 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. धक्क्यांमुळे इमारती हादरल्या आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्यांनी तातडीने त्सुनामीचा इशारा जारी केला, जो काही तासांनंतर मागे घेण्यात आला.

घरे हादरली - 

रशियन सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओंमध्ये घरांतील फर्निचर, लाईट फिक्स्चर जोराने हलताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये रस्त्यावर पार्क केलेली कार पुढे-मागे हलताना स्पष्टपणे दिसत आहे. 

भूकंपाचे केंद्रस्थान

यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पेट्रोपाव्लोव्स्क-कामचटस्की शहरापासून 128 किमी (80 मैल) पूर्वेला आणि 10 किमी (6 मैल) खोलीवर होता. रशियाच्या राज्य भूभौतिक सेवेने या भूकंपाची तीव्रता किंचित कमी म्हणजे 7.4 असल्याचे सांगितले. भूकंपानंतर किमान पाच आफ्टरशॉक नोंदवले गेले.

हेही वाचा - Doland Trump Statue : अमेरिकन संसदेबाहेर डोनाल्ड ट्रम्प यांचा 12 फुटी पुतळा; हातात बिटकॉइन

त्सुनामीचा धोका टळला

यूएस पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने सुरुवातीला किनारी भागांवर धोकादायक लाटा येण्याचा इशारा दिला होता. मात्र काही तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे सांगत हा इशारा मागे घेण्यात आला.

अधिकाऱ्यांचे आवाहन

कामचटका प्रदेशाचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी टेलिग्रामवर लिहिले की, 'आजची सकाळ पुन्हा एकदा कामचटका रहिवाशांच्या लवचिकतेची परीक्षा घेत आहे. सध्या कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. सर्वांनी शांत राहावे.'

हेही वाचा - Trump Helicopter Emergency Landing: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग

भूकंपप्रवण क्षेत्र

कामचटका द्वीपकल्प हा 'रिंग ऑफ फायर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेक्टोनिक पट्ट्याचा भाग आहे. पॅसिफिक महासागराला वेढणाऱ्या या पट्ट्यात भूकंप वारंवार होतात. यापूर्वी जुलै महिन्यात 8.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी आली होती, ज्यामुळे किनाऱ्यावरील एका गावाचा काही भाग समुद्रात वाहून गेला होता.


सम्बन्धित सामग्री