America Attacks Iran : इराण-इस्रायल यांच्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी संघर्षात आता अमेरिकेने थेट सहभाग घेतला आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुप्रकल्पांना लक्ष्य केले आहे. अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमधील तीन अणु प्रकल्पांना लक्ष्य केले. ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडियावर लिहिले की, “आम्ही इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील तीन अणुप्रकल्पांवर यशस्वी हल्ले केले आहेत.”
अमेरिकेने इराणवर हल्ला केला आहे. इराण-इस्रायल (Israel Iran War) युद्ध सुरू झाल्यापासून अशी भीती होती की, अमेरिका कधीही इराणवर हल्ला करू शकते. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. माहितीनुसार, अमेरिकेने इराणमधील तीन अणुप्रकल्पांवर हल्ला केला आहे.
ट्रम्पने ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आम्ही इराणच्या अणुकार्यक्रमामधील तीन ठिकाणांवर हल्ला केला आहे, ज्यात फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान यांचा समावेश आहे. सर्व विमाने आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत. फोर्डोवर बॉम्बचा संपूर्ण पेलोड टाकण्यात आला आहे." रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की अमेरिकेने हल्ले करण्यासाठी दोन B2 बॉम्बिंग विमाने वापरली. अमेरिकेने अशा बॉम्बचा वापर केल्याची ही पहिलीच घटना आहे.
हेही वाचा - इराणने भारतीयांसाठी उघडले हवाई क्षेत्र! आज 1 हजार भारतीय मायदेशी परतणार
भविष्यात मोठे हल्ले होतील - ट्रम्प
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "इराणने आता शांत रहावे. जर त्यांनी तसे केले नाही, तर भविष्यात होणारे हल्ले खूप मोठे असतील. ते आपल्या लोकांना मारत आहेत, त्यांच्या जनरल कासिम सुलेमानीने अनेक लोक मारले. मी खूप आधी ठरवले होते की, मी हे होऊ देणार नाही. हे चालू राहणार नाही."
नेतन्याहू काय म्हणाले?
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक निवेदन जारी केले. नेतन्याहू म्हणाले आहेत की, अमेरिकेने असे केले आहे जे जगातील इतर कोणताही देश करू शकत नाही. ते म्हणाले, "अभिनंदन अध्यक्ष ट्रम्प. इराणच्या अणुस्थळांना लक्ष्य करण्याचा तुमचा धाडसी निर्णय इतिहास बदलेल."
इराणी सर्वोच्च नेते खामेनी यांनी इशारा दिला होता
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आधीच सांगितले होते की, अमेरिकेने या युद्धात हस्तक्षेप करू नये. त्यांनी इशारा दिला होता की, जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही तेच म्हटले होते.
दरम्यान, इराणमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, ते नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरिकांना त्यांच्या सरकारच्या विनंतीनुसार इराणमधून बाहेर काढण्यात मदत करतील. भारत सतत इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढत आहे.
हेही वाचा - इस्रायलचा इराणच्या अणु तळ आणि क्षेपणास्त्र कारखान्यावर हवाई हल्ला; संरक्षण मंत्रालयासह सर्व काही उद्ध्वस्त