Tuesday, September 02, 2025 03:51:36 PM

India-US Relations: 'पाकिस्तानशी व्यवसाय करण्यासाठी भारताशी संबंध तोडले'; अमेरिकेच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा ट्रम्पवर आरोप

सुलिव्हन यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांनी त्यांच्या कुटुंबाच्या पाकिस्तानसोबतच्या व्यावसायिक हितसंबंधांना चालना देण्यासाठी भारताशी असलेले दशके जुने धोरणात्मक संबंध दुर्लक्षित केले.

india-us relations पाकिस्तानशी व्यवसाय करण्यासाठी भारताशी संबंध तोडले अमेरिकेच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा ट्रम्पवर आरोप

India-US Relations: अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जेक सुलिव्हन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुलिव्हन यांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प यांनी त्यांच्या कुटुंबाच्या पाकिस्तानसोबतच्या व्यावसायिक हितसंबंधांना चालना देण्यासाठी भारताशी असलेले दशके जुने धोरणात्मक संबंध दुर्लक्षित केले. युट्यूब चॅनल मेडासटचला दिलेल्या मुलाखतीत सुलिव्हन यांनी सांगितले की, भारतासोबत तंत्रज्ञान, प्रतिभा, अर्थव्यवस्था आणि चीनकडून येणाऱ्या धोरणात्मक धोक्याला सामोरे जाण्यासाठी दीर्घकाळापासून अमेरिकेने मजबूत संबंध ठेवले होते. मात्र ट्रम्प यांच्या निर्णयामुळे या नात्याला धक्का बसला असून, हे अमेरिकेसाठी 'मोठे धोरणात्मक नुकसान' ठरले आहे.

हेही वाचा - Donald Trump Social Media Post : 'भारतात व्यवसाय करणे कठीण...', डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मिडीया पोस्टने वेधलं लक्ष

सुलिव्हन यांनी इशारा दिला की जर भारतासारख्या महत्त्वाच्या देशासोबत अमेरिकेने आपले वचन पाळले नाही, तर जर्मनी, जपान, कॅनडा यांसारखे देशदेखील अमेरिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. दरम्यान, ट्रम्प यांचे पाकिस्तानसोबतचे संबंध वेगाने मजबूत झाले आहेत. एप्रिल 2024 मध्ये त्यांच्या कुटुंबाशी संबंधित वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल या क्रिप्टो कंपनीने पाकिस्तानसोबत मोठे करार केले. त्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासोबत ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बैठक घेतली. 

हेही वाचा Ind VS China: चीनची भारताविरोधी डाव; 'या' आवश्यक गोष्टीवर पुन्हा बंदी घालणार; शेतकऱ्यांवर होणार परिणाम

याशिवाय, जुलै 2024 मध्ये ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत व्यापार करार जाहीर करत भारतीय वस्तूंवर 25% कर लावण्याची धमकीही दिली. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचा दावा केला होता, मात्र सुलिव्हन यांनी तो दावा फेटाळला. उलट भारतासारख्या महत्त्वाच्या भागीदाराला दुर्लक्षित करून पाकिस्तानसोबत व्यावसायिक हित साधण्याचा प्रयत्न अमेरिकेसाठी घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


सम्बन्धित सामग्री