Thursday, September 18, 2025 09:24:23 AM

Meloni Wishes PM Modi: 'प्रेरणेचा स्रोत' म्हणत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

meloni wishes pm modi प्रेरणेचा स्रोत म्हणत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

Meloni Wishes PM Modi: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय पातळीवरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मेलोनी यांनी म्हटलं आहे की, 'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. त्यांची ताकद, दृढनिश्चय आणि लाखो लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता प्रेरणादायी आहे. मैत्री आणि आदराने, मी त्यांना उत्तम आरोग्य आणि उर्जेच्या शुभेच्छा देते, जेणेकरून ते भारताला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाऊ शकतील आणि आपल्या राष्ट्रांमधील संबंध अधिक मजबूत करू शकतील.' 

हेही वाचाDonald Trump To Narendra Modi : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पंतप्रधान मोदींना शुभेच्छा; म्हणाले, 'तुमच्या पाठिंब्यामुळे रशिया-युक्रेनच युद्ध संपुष्ठात'

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरून मोदींना शुभेच्छा दिल्या. ट्रम्प यांनी लिहिले, 'माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर छान संभाषण झाले. मी त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या. ते उत्तम काम करत आहेत. नरेंद्र, रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यात तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद!' 

हेही वाचा - PM Narendra Modi Gifts Online Auction : पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव; तुळजाभवानीची मूर्ती 1 कोटींहून अधिक किमतीची

दरम्यान, 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय दौरे करून भारताचे जागतिक संबंध मजबूत केले आहेत. रशिया, अमेरिका, चीन यांसारख्या महासत्तांशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्यात त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच मोदींची प्रतिमा आज जागतिक नेते म्हणून ओळखली जाते.
 


सम्बन्धित सामग्री