PM Sushila Karki: नेपाळमधील सिंह दरबार येथे 14 सप्टेंबर रोजी नेपाळच्या प्रभारी पंतप्रधान सुशीला कार्की यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी अॅक्शन मोडमध्ये येत तरुणांवरील क्रूरतेची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांनी स्पष्ट केले की, 'मी आणि माझी टीम सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही. आम्ही सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ राहणार नाही.' यावेळी त्यांनी जनता आणि नेत्यांच्या सहकार्याशिवाय यश मिळणार नाही असेही सांगितले.
प्रभारी पंतप्रधानपदाबाबत अनेक चर्चा चालू असतानाच, 12 सप्टेंबर रोजी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. या कार्यक्रमास अनेक तरुण नेते उपस्थित होते. कार्की यांनी सध्या आपल्या मंत्रिमंडळाच्या अंतिम रूपासाठी जवळच्या सल्लागार आणि जनरल जी चळवळीतील प्रमुखांशी सल्लामसलत सुरू केली आहे. नेपाळी माध्यमांनुसार, सर्व 25 मंत्रालयांचा अधिकार कार्कींकडे असूनही, त्या सुमारे 15 मंत्र्यांसह सुव्यवस्थित मंत्रिमंडळ स्थापन करण्याची तयारी करत आहेत.
हेही वाचा - Nepal Interim PM: सुशीला कार्की यांनी नेपाळच्या प्रभारी पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला; आज मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित
संभाव्य मंत्र्यांमध्ये कायदेतज्ज्ञ ओम प्रकाश अर्याल, माजी लष्करी अधिकारी बालानंद शर्मा, निवृत्त न्यायाधीश आनंद मोहन भट्टाराई, माधव सुंदर खडका, अशिम मान सिंग बसन्यात, आणि ऊर्जातज्ज्ञ कुलमन घिसिंग यांचा समावेश आहे.
हेही वाचा - Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची कबुली; भारतासोबतचे संबंध 'या' कारणामुळे बिघडले’ म्हणाले, माझी चूक...
दरम्यान, नेपाळची संसद गेल्या शुक्रवारी औपचारिकपणे विसर्जित करण्यात आली असून, नवीन निवडणुका 5 मार्च 2026 रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार्की यांनी आपल्या पहिल्या निवेदनातच स्पष्ट केले की, त्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ सत्तेत राहणार नाहीत. निवडणूका झाल्यानंतर त्या नवीन संसदेकडे देशाची जबाबदारी सोपवतील.